Advertisement

#Metoo: आलोक नाथ अाणखी अडचणीत; संध्या मृदूल यांचाही गैरवर्तनाचा अारोप

संध्या मृदुल यांनी ट्टीट करत अालोक नाथ यांनी अापल्याला कसा मानसिक त्रास दिला हे सांगितलं अाहे. अालोक नाथ यांच्याविषयी मला फार अादर होता. मी तेव्हा नवीन होते. माझ्याशी ते चांगुलपणाने वागायचे. त्यामुळे मी प्रभावित झाले होते. ते सेटवर मला मुलीसारखेच वागवायचे. मात्र, एक दिवस त्यांचा खरा चेहरा उघड झाला.

#Metoo: आलोक नाथ अाणखी अडचणीत; संध्या मृदूल यांचाही गैरवर्तनाचा अारोप
SHARES

बाॅलीवूडमध्ये 'मी टू' चळवळीला जोर पकडत असल्याचं दिसून येत अाहे. त्याचबरोबर बाॅलीवूडमधील संस्कारी बाबूजी म्हणून ओळख असलेले आलोक नाथ यांच्यापुढील अडचणी अाणखी वाढण्याची चिन्हं अाहेत. विनता नंदा आणि नवनीत निशान यांच्यानंतर अाता अभिनेत्री संध्या मृदुलनंही अालोक नाथ यांच्यावर लैंगिक छळाचा अारोप केला अाहे.  चित्रीकरणावेळी ते मला मला सर्वांसमोर मुलीसारखं वागवायचे. पण माझ्या रूममध्ये येऊन त्यांनी माझ्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. ते मला वारंवार फोन करून मानसिक त्रास देत होते, असे अनेक गंभीर अारोप संध्या यांनी केले अाहेत.


खरा चेहरा उघड

संध्या मृदुल यांनी ट्टीट करत अालोक नाथ यांनी अापल्याला कसा मानसिक त्रास दिला हे सांगितलं अाहे. संध्या म्हणाल्या की, अालोक नाथ यांच्याविषयी मला फार अादर होता. मी तेव्हा नवीन होते. माझ्याशी ते चांगुलपणाने वागायचे. त्यामुळे मी प्रभावित झाले होते. ते सेटवर मला मुलीसारखेच वागवायचे. मात्र, एक दिवस त्यांचा खरा चेहरा उघड झाला. एकदा मालिकेतील सर्वांसाठी डिनर ठेवले होते. त्यामुळे रात्री हाॅटेलवर जायला उशीर झाला. त्यादिवशी दारू पिऊन अालोक नाथ माझ्या रूममध्ये अाले. त्यांनी माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मी रुमबाहेर पळ काढला. त्यानंतरही ते माझ्या रूममध्ये होते. त्यांना कसंबसं अाम्ही रुममधून बाहेर काढलं. पण तरीही ते माझ्यावर ओरडत होते अाणि जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होते.

रिमा लागू अाईसारख्या

त्यानंतरही त्यांनी मला त्रास देणं थांबवलं नाही. ते रोज फोन करून त्रास द्यायचे. तसंच दारू पिऊनही यायचे. माझ्यासाठी हे सहन न होण्यापलीकडचं होतं. चित्रीकरणावेळी पूर्णवेळ माझ्यासोबत माझी हेअरड्रेसर असायची. यावेळी सर्वच सहकलाकारांनी मला साथ दिली. रिमा लागू यांनी तर मुलीसारखी माझी काळजी घेतली. त्या सतत माझ्यासोबत रहायच्या अाणि अालोक नाथपासून मला लांब ठेवण्याचा प्रयत्न करायच्या. आईसारख्या त्या माझ्यापाठी खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यानंतर अालोक नाथ यांनी माझी माफी मागितली. पण याला खूप उशिर झाला होता. यावेळी मी खूप मानसिक त्रासातून गेले, असं संध्या यांनी म्हटलं



हेही वाचा - 


#Metoo : 'संस्कारी बाबूजीं'च्या अडचणीत वाढ

#Metoo: नाना पाटेकरनंतर कैलाश खेर, विकास बहल यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप





Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा