शशांक-प्रियांकाची पहिली संक्रांत कलर्ससोबत!

मराठी अभिनेता शशांक केतकर आणि प्रियांका ढवळे हे नुकतेच विवाह बंधनात अडकले आहेत. त्यांच्या विवाहाच्या आधी जशा त्यांच्याबद्दल चर्चा सुरु होत्या, तशाच त्या त्यांच्या विवाहानंतरही सुरु आहेत. येणारी मकर संक्रांत या नव्या जोडप्याची पहिलीच मकर संक्रांत असणार असल्यामुळे 'कलर्स मराठी'वरील 'आज काय स्पेशल' या खवय्यांच्या कार्यक्रमात त्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

प्रशांत दामलेंशी मनमोकळ्या गप्पा!

नवनवीन पदार्थ शिकवणाऱ्या या कार्यक्रमाने अल्पावधीतच समस्त स्त्री वर्गाची मने जिंकली आहेत. मकर संक्रातीनिमित्त मराठी मनोरंजन क्ष्रेत्रातील प्रेक्षकांचा लाडका शशांक केतकर त्याच्या पत्नी प्रियांकासह कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे. या एपिसोडमध्ये दोघांच्या प्रशांत दामले यांच्याशी बऱ्याच मनमोकळ्या गप्पा होणार आहेत.

शशांकची भोगी, तर प्रियांकाचे तीळलाडू!

या भागात शशांकने भोगीची भाजी तर प्रियांकाने तिळगुळाचे लाडू बनवले आहेत. हे पदार्थ बनवताना प्रशांत दामलेंनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे देखील या दोघांनी अगदी बिनधास्तपणे दिली. यावेळी दोघांनी एकमेकांच्या आवडी निवडी प्रेक्षकांबरोबर शेअर केल्या आहेत. याचबरोबर यानिमित्ताने शशांक-प्रियांकाचं कौतुक करताना दिसला. लग्नाच्या अनेक आठवणीही त्यांनी प्रेक्षकांना सांगितल्या आहेत.

प्रियांकाला आवडतं केळवण!

खासकरून प्रियांकाने केळवणच्या वेळची आठवण सांगितली आहे. प्रियांका म्हणाली, 'तिला केळवण खूप आवडतं, कारण या दरम्यान आवडीच्या अनेक गोष्टी खायला मिळतात. प्रियांकाला मकर संक्रातीच्या विशेष भागानिमित्त काळ्या रंगाची साडीही यावेळी भेट म्हणून देण्यात आली.


हेही वाचा

कोणत्या गोष्टीमुळे वैतागला सुयश?

पुढील बातमी
इतर बातम्या