Advertisement

कोणत्या गोष्टीमुळे वैतागला सुयश?


कोणत्या गोष्टीमुळे वैतागला सुयश?
SHARES

'का रे दुरावा' फेम जय अर्थात सुयश टिळक याने 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील पाठकबाई म्हणजेच अक्षया देवधर हिच्याबरोबरचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र या दोघांनी आपल्या नात्याबद्दल नेहमीच मौन बाळगलं आहे. पण दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर सुयशने अक्षया बरोबरचा एक फोटो शेअर केल्यानंतर चक्क या दोघांचा साखरपुडा झाला या चर्चेला उधाण आलं. अखेर ही चर्चा चुकीची आहे, असा खुलासा सुयशने केला आहे.
सुयशने त्याच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवरून अक्षया बरोबर एक फोटो शेअर केला होता. तो फोटो शेअर करत त्याने सगळ्यांना नव वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या. मात्र यावेळी अक्षयाच्या हातातील अंगठीमुळे त्यांच्या दोघांच्या नात्याविषयी उलट-सुलट चर्चा रंगू लागली. त्या दोघांचा साखरपुडा झाला आहे, अशा बातम्यांना ऊत आला. या बातम्यांमुळे सुयश चांगलाच चिडला आहे. याबाबत त्याला फोनकरून प्रश्न विचारले जात आहेत. आता लोकांच्या प्रश्नाला उत्तर देऊन तो वैतागला आहे.


काय आहे त्या फोटोत?

सुयशने नववर्षाच्या शुभेच्छा देताना अक्षयाबरोबर एक फोटो शेअर केला. त्या फोटोच्या खाली त्याने 'नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रेम, आनंद सगळीकडे पसरवा', अशी कॅप्शन दिली आहे. या फोटोत अक्षयाच्या हातात सुंदर अंगठी आहे. त्याने हा फोटो शेअर करताच 'तुम्ही साखरपुडा केला?', अशा अनेक प्रतिक्रिया त्याला आल्या होत्या.हेही वाचा

हे आहेत पाठक बाईंचे खरे 'राणा'

संबंधित विषय
Advertisement