हे आहेत पाठक बाईंचे खरे 'राणा'

 Mumbai
हे आहेत पाठक बाईंचे खरे 'राणा'
Mumbai  -  

'तुझ्यात जीव रंगला ' ह्या मालिकेने खूप कमी वेळात प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. राणादा आणि पाठकबाई तर जणू सगळ्यांच्या घरचा एक भागच झाले आहेत. राणा म्हणजेच हार्दिक जोशी आणि अंजली म्हणजेच अक्षया देवधर ह्यांची फॅन फॉलोईंग तर दिवसेंदिवस वाढतच जातेय. पण पाठकबाईंचा खऱ्या आयुष्यातला राणा कोण आहे ह्याची आम्हाला बातमी मिळालीये.

अक्षया आणि सुयश ह्यांच्यात मैत्रीपेक्षाहीि काहीतरी जास्त असल्याची चर्चा सध्या रंगू लागली आहे. अक्षया आणि सुयश च्या इंस्टाग्रामवर त्या दोघांचे बरेच एकत्र फोटो पाहायला मिळतायत.

अक्षयाने त्या दोघांच्या एका फोटो कॅप्शनमध्ये It's ur day Darling...happy bday...!! Luv u..❤❤❤ असं लिहिलं आहे.

सुयश सध्या त्याच्या कलर्स मराठीवरील 'सख्या रे' ह्या मालिकेत बिझी आहे तर अक्षया 'तुझ्यात जीव रंगला ' ह्या मालिकेमुळे कोल्हापूरला शूट करण्यात बिझी आहे त्यामुळे त्या दोघांना सध्या एकमेकांसाठी वेळ मिळत नसणार म्हणून अक्षयाने दोघांचा आणखी एक फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला असून त्यात Missing u.. !Love❤️ असं मी म्हटलय...

ह्या दोघांमध्ये मैत्रीपेक्षाही जास्त काही असल्याची चर्चा सध्या सोशल मीडिया चांगल्याच व्हायरल होताना पाहायला मिळतेय .पण त्या दोघांकडून मात्र अजून तरी असं काही जाहीर करण्यात आलेलं नाहीये.Loading Comments