#Metoo: विकास बहल आणखी गोत्यात; लैंगिक अत्याचार केल्याचं महिलेचं प्रतिज्ञापत्र

दिग्दर्शक विकास बहल याने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्यासंबंधीचं प्रतिज्ञापत्र गुरूवारी पीडित महिलेनं मुंबई उच्च न्यायालायात सादर केलं आहे. त्यामुळं आता विकास बहलच्या अडचणी वाढणार असल्याचं म्हटलं जात आहे.

दहा कोटींचा दावा 

मी टू मोहिमेंतर्गत विकास बहल याच्यावरही लैंगिक अत्याचाराचा आरोप झाला आहे. तर त्याच्यावर हा आरोप करणारी पीडित महिला ही फँटम फिल्मस् कंपनीमधील कर्मचारी आहे. बहलने हे आरोप फेटाळून लावले. मात्र त्याचवेळी फँटम फिल्मस् कंपनीतील विकास बहलचे पार्टनर अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवानी यांच्यासह अन्य काही जणांनी महिलेचं समर्थन केलं होतं. या समर्थनानंतर विकास बहल याने अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानीसह अन्य लोकांवर दहा कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे.

सुनावणी २१ नोव्हेंबरला

 या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. पीडित महिला आता समोर आली आहे. महिलेनं आपल्यावर विकास बहलने लैंगिक अत्याचार केल्याचं प्रतिज्ञापत्र न्यायालयाकडे सादर केलं आहे. इतकंच नव्हे तर शपथेवरही न्यायालयात ही माहिती दिली आहे. त्यामुळं आता विकास बहल अडचणीत येण्याची शक्यता आहे. यावरील अंतिम सुनावणी २१ नोव्हेंबरला होणार आहे. 


हेही वाचा - 

#MeToo: तनुश्री लेस्बियन, माझ्यावर बलात्कार केला, राखी सावंतचा आरोप


पुढील बातमी
इतर बातम्या