Advertisement

#MeToo: तनुश्री लेस्बियन, माझ्यावर बलात्कार केला, राखी सावंतचा आरोप

एकटेपणाचा फायदा घेऊन तनुश्रीने माझ्यावर अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. कारण तनुश्री समलैंगिक आहे, असा आरोप राखी सावंतने केला आहे.

#MeToo: तनुश्री लेस्बियन, माझ्यावर बलात्कार केला, राखी सावंतचा आरोप
SHARES

तनुश्री दत्ता लेस्बियन असून तिने माझ्यावर बलात्कार केल्याचा खळबळजनक आरोप आयटम गर्ल राखी सावंत हिने केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत राखीने पुन्हा एकदा तनुश्री दत्ताला टार्गेट केलं आहे. एवढंच नाही, तर बलात्कार प्रकरणात २ साक्षीदार समोर आणण्याची तयारीही राखीने दाखवली आहे.


राखीचा पलटवार

नेहमीच वादग्रस्त आणि काहीशी हास्यास्पद विधानं करणारी राखी सावंत या पत्रकार परिषदेला चक्क साडी घालून आणि डोक्यावर पदर घेऊन अवतरली होती. 'हाॅर्न ओके प्लीज' सिनेमात तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केल्यानंतर राखी त्यांचा बचाव करण्यासाठी पुढे सरसावली होती. या सिनेमातून तनुश्री बाहेर पडल्यावर तिच्या ऐवजी राखीने सिनेमातील आयटम साँग केलं होतं.


अब्रुनुकसानीचा दावा

राखीच्या आरोपानंतर तनुश्रीने काही दिवसांपूर्वीच ओशिवरा पोलिस ठाण्यात राखीविरोधात लेखी तक्रार करत तिच्यावर १० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा न्यायालयात दाखल केला. त्यावर पलटवार करताना राखीने तनुश्रीवर ५० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं सांगितलं.


काय म्हणाली राखी?

एवढ्यावर न भागल्यामुळे राखीने पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली तिथं राखी म्हणाली की तनुश्री आणि मी १० वर्षांपूर्वी चांगल्या मैत्रिणी होतो. आम्ही दोघी मिळून बाॅलिवूडच्या अनेक पार्ट्यांना जायचो. तेव्हा एकटेपणाचा फायदा घेऊन तनुश्रीने माझ्यावर अनेकदा  बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. कारण तनुश्री समलैंगिक आहे. तसं तर बाॅलिवूडमध्ये अनेक नट्या समलैंगिक आहेत, परंतु मी फक्त तनुश्रीबद्दल बोलतेय कारण तिने माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. आपण केलेले आरोप खरे असून बलात्कार प्रकरणाचे २ साक्षीदार न्यायालयासमोर हजर करण्यास तयार असल्याचंही राखी यावेळी म्हणाली.



हेही वाचा-

राखी सावंतविरोधात तनुश्रीचा १० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

नाना पाटेकर -तनुश्री दत्ता वाद : राखी सावंतला धमक्यांचे फोन


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा