Advertisement

राखी सावंतविरोधात तनुश्रीचा १० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा


राखी सावंतविरोधात तनुश्रीचा १० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
SHARES

अभिनेते नाना पाटेकर यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या तनुश्री दत्ताविरोधात अभिनेत्री राखी सावंत हीनं काही वादग्रस्त विधानं केली होती. त्यामुळे आता तनुश्रीनं आपला मोर्चा राखीकडे वळवला आहे. राखीविरोधात तनुश्रीनं १० कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. या संबंधीची कायदेशीर नोटीस लवकरच राखीला पाठवली जाणार असल्याची माहिती तनुश्रीचे वकील अॅड. नितीन सातपुते यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.


का ठोकला अब्रुनुकसानीचा दावा?

नाना विरोधात तनुश्रीने लैंगिक शोषणचा आरोप केल्यानंतर नानांसह अन्य जणांविरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर नाना आणि अन्य जणांना त्वरित अटक करत त्यांची नार्को टेस्ट करण्याची तनुश्रीची मागणी आहे. तनुश्रीच्या आरोपानंतर रखीनं एका मुलाखतीत तनुश्री ड्रग्ज घेऊन तिच्या व्हॅनिटीमध्ये पडली होती. त्यामुळेच तिचं गाणं नाना आणि गणेश आचार्य यांच्या सांगण्यावरून आपल्याला करावं लागलं होतं, असंही राखीनं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान राखीनं तनुश्रीविरोधात यावेळी अनेक अपशब्द वापरले असल्याचं अॅड. सातपुते यांनी सांगितलं आहे. त्यामुळेच तिच्याविरोधात १० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.



हेही वाचा - 

#MeToo: माझ्यावरील अारोप खोटे, नाना पाटेकरांचं सिन्टाला उत्तर

#Metoo : 'संस्कारी बाबूजीं'च्या अडचणीत वाढ

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा