नाना पाटेकर, गणेश आचार्यसह दिग्दर्शक, निर्मात्याविरोधात गुन्हा दाखल

तनुश्री दत्तासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य, सामी सिद्धीकी आणि राकेश सारंग यांच्याविरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला. या चौघांविरोधात पोलिसांनी भा.दं.वि कलम ३५४ आणि ५०९ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नाना पाटेकर, गणेश आचार्यसह दिग्दर्शक, निर्मात्याविरोधात गुन्हा दाखल
SHARES

‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्री तनुश्री दत्तासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य, सामी सिद्धीकी आणि राकेश सारंग यांच्याविरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला. या चौघांविरोधात पोलिसांनी भा.दं.वि कलम ३५४ आणि ५०९ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. यावेळी तनुश्री दत्ता ही तिच्या वकिलांसोबत उपस्थित होती.


अखेर तक्रार नोंदवून घेतली

हाॅर्न ओके प्लिज या चित्रपटाच्या सेटवर झालेल्या या गैरवर्तणुकीप्रकरणी अभिनेत्री तनुश्री दत्ताने यापूर्वीच ओशिवरा पोलिस ठाण्यात या चौघांविरोधात लेखी तक्रार नोंदवली होती. मात्र ही घटना दहा वर्षांपूर्वीची आहे, आता त्याचा काय संबध? असं सांगून पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. तर न्यायालयात धाव घेणार असल्याचंही तनुश्रीने प्रसार माध्यमांना सांगितलं होतं. दरम्यान ओशिवरा पोलिसांनी बुधवारी संध्याकाळी तनुश्रीला गुन्हा नोंदवण्यासाठी बोलवलं होतं. 


४० पानी पुरावा सादर

तनुश्रीने दिलेल्या तक्रारीनुसार ओशिवरा पोलिसांनी ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर, गणेश आचार्य, सामी सिद्धीकी आणि राकेश सारंग यांच्याविरोधात विनयभंग आणि लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केल्याच्या कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या सर्वांचा पुरावा म्हणून तनुश्रीने तिचे वकील अॅड. नितीन सातपुते यांच्यामार्फत ४० पानी पुरावाही पोलिसांकडे सादर केला आहे.

याप्रकरणी ओशिवरा पोलिस आता लवकरच ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, गणेश आचार्य, सामी सिद्धीकी आणि राकेश सारंग यांना चौकशीसाठी बोलवणार असल्याचं कळतं.


हेही वाचा -

तनुश्रीच्या तक्रारीची दखल, महिला आयोगानं नानाला बजावली नोटीस

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा