Advertisement

तनुश्रीच्या तक्रारीची दखल, महिला आयोगानं नानाला बजावली नोटीस

महिला आयोगानं नानांसह गणेश आचार्य, निर्माता समीर सिद्धीकी, दिग्दर्शक राकेश सारंग यांना नोटीस बजावली आहे. या नोटीशीनुसार या चौघाजणांना १० दिवसांत आपलं म्हणणं आयोगाकडे मांडण्याचे निर्देश दिले आहेत.

तनुश्रीच्या तक्रारीची दखल, महिला आयोगानं नानाला बजावली नोटीस
SHARES

अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेता नाना पाटेकरविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप करत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडेही तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची दखल घेत महिला आयोगानं नानांसह गणेश आचार्य, निर्माता समीर सिद्धीकी, दिग्दर्शक राकेश सारंग यांना नोटीस बजावली आहे. या नोटीशीनुसार या चौघाजणांना १० दिवसांत आपलं म्हणणं आयोगाकडे मांडण्याचे निर्देश दिल्याची माहिती आयोगाकडून देण्यात आली आहे.


उपस्थित राहण्याचे निर्देश

'हाॅर्न ओके प्लिज' या चित्रपटादरम्यान, १० वर्षांपूर्वी नानांकडून लैंगिक शोषण झाल्याचा तनुश्रीचा आरोप आहे. याविरोधात तिने अोशिवरा पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. नानाने देखील तनुश्रीला कायदेशीर नोटीस बजावली आहे. इतक्यावरच न थांबता तिने महिला आयोगाकडे सोमवारी रितसर तक्रार दाखल केली. तनुश्रीच्या वकिलांमार्फत ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यासाठी तनुश्रीने स्वत: उपस्थित राहण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.


अडचणीत वाढ

तनुश्रीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणी काय कारवाई केली? याचा अहवालदेखील आयोगाने आेशिवरा पोलिसांकडून मागितला आहे. नोटीशीनुसार नानांसह अन्य तिघांना येत्या १० दिवसांत आपलं म्हणणं मांडावं लागणार आहे. त्यामुळे नानाच्या अडचणीत वाढ झाली असून नाना या नोटीशीला काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.


असोसिएशनला आदेश

चित्रपटसृष्टीतील अशा घटना रोखण्याची जबाबदारी निर्माते, दिग्दर्शक तसंच संबंधित संघटनांची देखील आहे. महिलांबाबत होणारे गैरप्रकार रोखण्यास तक्रार करण्यासाठी यंत्रणा असणं आवश्यक आहे. त्यादृष्टीने कामाच्या ठिकाणी होणारं लैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा २०१३ नुसार सिने अॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनने तात्काळ अतंर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करावी, असे आदेशही आयोगने सिने अॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनला दिले आहेत.



हेही वाचा-

#Metoo : 'संस्कारी बाबूजीं'च्या अडचणीत वाढ

'हाॅटस्टार'ने रद्द केला एआयबीचा तिसरा सिझन



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा