Advertisement

'हाॅटस्टार'ने रद्द केला एआयबीचा तिसरा सिझन

व्हिडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफाॅर्म 'हाॅटस्टार'ने एआयबीचा तिसरा सिझन दाखवण्यास नकार दिल्याने हा सिझनच रद्द करण्याची नामुश्की एआयबीवर ओढावली आहे.

'हाॅटस्टार'ने रद्द केला एआयबीचा तिसरा सिझन
SHARES

'आॅल इंडिया बकचोद' (एआयबी)पुढील अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर एआयबीचे सीईओ तन्मय भट आणि सदस्य गुरसिमरन खंबा यांना एआयबीच्या ह्युमन रिसोर्स टीमने बाहेरचा रस्ता दाखवूनही कंपनीवर सोशल मीडियावरून होणारी टीका थांबलेली नाही. तर दुसरीकडे व्हिडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफाॅर्म 'हाॅटस्टार'ने एआयबीचा तिसरा सिझन दाखवण्यास नकार दिल्याने हा सिझनच रद्द करण्याची नामुश्की एआयबीवर ओढावली आहे.


'हाॅटस्टार'कडून खुलासा

एआयबी हा शो 'हाॅटस्टार'वर दाखवण्यात येतो. हा शो रद्द करण्यामागचं कारण देण्यासाठी 'हाॅटस्टार'ने सोशल मीडियावर खुलासा प्रसिद्ध केला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, ''एआयबीचा तिसरा सिझन आम्ही तात्काळ प्रभावाने रद्द करत आहोत. जे आमच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन काम करतात तसंच महिलांचा आदर न राखता त्यांची सुरक्षितता धोक्यात आणतात. अशा काही घटनांमुळे आम्ही चिंतीत झालो आहोत. ''



काॅमेडी शो बंद

यासंदर्भात एआयबीचे प्रमुख अधिकारी रोहन जोशीने देखील आपल्या इंस्टाग्रामवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या पोस्टवर ते म्हणाले, ''सेट बनवण्यापासून ते लिखाणापर्यंत ज्या व्यक्तींनी या शोमध्ये पूर्ण क्षमतेने काम केलं, त्या सर्वांना मला धन्यवाद द्यायचे आहेत. तुम्ही आमच्या टीमपैकी कुणालाही हायर करू शकता, तुम्ही कधीच निराश होणार नाहीत. मला स्टार टीमला देखील धन्यवाद द्यायचे आहेत. ज्यांनी आमचा हा शो बघितला, त्या प्रेक्षकांना देखील आम्हाला धन्यवाद द्यायचे आहेत. माझा स्वत:चा काॅमेडी शो आता बंद हाेत आहे. हा माझ्या जीवनातील उत्तम अनुभव होता.''




कसं आलं प्रकरण पुढे?

एका महिलेने एआयबीचे सदस्य उत्सव चक्रवर्ती याच्यावर सोशल मीडियातून छेडछाडीचा आरोप केल्यावर हे प्रकरण पुढे आलं. तन्मय भटला या प्रकरणाची माहिती होती, तरीही त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं. उत्सववर कुठलीही कारवाई केली नाही, असा आरोपही तिने केला. त्यानंतर सोशल मीडियावरून फाॅलोअर्सनी तन्मय आणि एआयबीवर चांगलीच टीका केली. गुरसिमरन खंबा याच्यावरही मानसिक छळाचे आरोप करण्यात आले आहेत.



हेही वाचा-

एआयबीला तन्मय भट, गुरसिमरनची सोडचिठ्ठी!

तनुश्री दत्ताची आता महिला आयोगाकडेही धाव



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा