Advertisement

नानांची नार्को टेस्ट करा! तनुश्रीची पोलिसांकडे मागणी

नाना आणि इतर आरोपींची नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर टेस्ट करावी अशीही मागणीही पोलिसांकडे केल्याची माहिती तनुश्रीचे वकील अॅड. नितीन सातपुते यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.

नानांची नार्को टेस्ट करा! तनुश्रीची पोलिसांकडे मागणी
SHARES

अभिनेते नाना पाटेकर यांच्याविरोधात लैंगिक शोषणाविरोधात गुन्हा दाखल होऊनही नानांना अटक होत नसल्याने अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि तिच्या वकिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. नाना आणि इतर आरोपींना त्वरीत अटक करावी, अशी मागणी पुन्हा एकदा तनुश्रीच्या वकिलांना पोलिसांकडे केली आहे. एवढंच नव्हे, तर नाना आणि इतर आरोपींची नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर टेस्ट करावी अशीही मागणीही पोलिसांकडे केल्याची माहिती तनुश्रीचे वकील अॅड. नितीन सातपुते यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.


अजून अटक का नाही?

'हाॅर्न ओके प्लीज' सिनेमाच्या चित्रिकरणादरम्यान नानांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा दावा करत तनुश्रीने सिनेसृष्टीत खळबळ उडवून दिली आहे. नानाबरोबरच गणेश आचार्य, निर्माता समी सिद्धिकी आणि दिग्शर्दशक राकेश सारंग यांच्याविरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. पण अद्याप याप्रकरणी नाना वा कुणालाही अटक झालेली नाही.


हायप्रोफाईल आरोपी

नानासह इतर आरोपी हायप्रोफाईल असून त्यांचे बऱ्यापैकी राजकीय संबंधही आहेत. त्यामुळे साक्षीदार पुढं येत नाहीत वा पुढे खोटे साक्षीदार उभी करण्याचीही भीती यांच्याकडून आहे. त्यामुळं या सर्वांना त्वरीत अटक करत त्यांची नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर टेस्ट करावी अशी मागणी एका पत्राद्वारे अॅड. सातपुते यांनी ओशिवरा पोलिसांकडे केली आहे.


तर, सत्य समोर येईल

अशी टेस्ट झाली तर या प्रकरणातील सत्य लागलीच समोर येईल, असंही अॅड. सातपुते यांचं म्हणणं आहे. नाना आणि इतरांना अटक झाली नाही किंवा नार्को टेस्टची मागणी मान्य झाली नाही, तर न्यायालयासमोर ही मागणी ठेऊ, असा इशाराही अॅड. सातपुते यांनी दिला आहे. नानाला अटक होते का, नानाची नार्को टेस्ट होते का? या सर्व बाबी पुढच्या आहेत, पण दिवसेंदिवस नानाच्या अडचणी वाढत चालल्यात हे मात्र खरं.



हेही वाचा-

'नानांनी असं करायला नको होतं', स्पॅाटबॅाय रामदास बोर्डे

नाना पाटेकर, गणेश आचार्यसह दिग्दर्शक, निर्मात्याविरोधात गुन्हा दाखल



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा