अमृता फडणवीस करत आहेत 'पाठलाग'!

गायिका अमृता फडणवीस आणि ‘आशिकी २’ फेम संगीतकार जीत गांगुली नेमका कोणाचा व कशासाठी ‘पाठलाग’ करतायेत? हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. त्यांचा हा ‘पाठलाग’ डाव या आगामी मराठी सिनेमासाठी आहे!

'रोज रोज पाठलाग सावली असेल ही अनोळखी, दूर दूर आसमंती आर्तता घुमेल ती कोणाची..."असे बोल असलेल्या या गीताचे रेकॉर्डिंग नुकतेच पूर्ण झाले.

अमृता फडणवीस यांनी हे गाणं गायलं असून जीत गांगुली यांनी ते संगीतबद्ध केलं आहे. संगीतकार जीत गांगुली यांचा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. 


हेही वाचा

'नाॅट ओन्ली मिसेस फडणवीस..!'

पुढील बातमी
इतर बातम्या