Advertisement

'नाॅट ओन्ली मिसेस फडणवीस..!'


'नाॅट ओन्ली मिसेस फडणवीस..!'
SHARES

अमृता फडणवीस यांची ओळख केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी एवढ्यापुरतीच मर्यादीत नाही. तर एक यशस्वी बँकर, माॅडेल, सोशालिस्ट अन् सिंगर म्हणून त्यांनी स्वत:ची वेगळी आयडेंटीटी निर्माण केलीय. घराचा उंबरठा ओलांडून वेगळं काही करू पाहणाऱ्या असंख्य महिलांना प्रेरणादायी ठरणाऱ्या मिसेस फडणवीस यांनी नवरात्रीनिमित्त शुक्रवारी 'मुंबई लाइव्ह'च्या आॅफिसला भेट देत वुमन ब्रिगेडशी दिलखुलास संवाद साधला.


अमृता फडणवीस यांच्या स्वतंत्र शैलीचा मूलमंत्र, बघा ...




मनाप्रमाणं काम करण्याची मुभा

देवेंद्र फडणवीस माझे पती असले, तरी माझी स्वत:ची वेगळी ओळख आहे. मला गायला आवडतं. सामाजिक कामं करायला आवडतात. माझी आई माझं प्रेरणास्थान आहे. आई-वडिलांनीच माझ्यावर चांगले संस्कार केलेत. म्हणूनच देवेंद्रजींनी मला माझ्या मनाप्रमाणं काम करण्यासाची मुभा दिलीय. ते कधीच मला अडवत नाहीत.


लोकांच्या कामांना पहिलं प्राधान्य

सकाळच्या ब्रेकफास्टपासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत देवेंद्रजींच्या आजू-बाजूला सतत माणसं भेटीसाठी आलेले असतात. त्यामुळे देवेंद्रजींशी दिवसभरात माझं जास्त बोलणं होत नाही, मनमोकळ्या गप्पा मारता येत नाहीत. पण, मला या गोष्टीचा कधी राग येत नाही. कारण, सामान्य माणसांच्या अडचणी सोडवण्याला त्यांनी प्राधान्य द्यावं असंच मला वाटतं.


महानायकासोबत काम करतानाचा अनुभव

महानायक अमिताभ बच्चन यांच्यासमोर गेल्यावर सुरुवातीला मला भीती वाटली होती. पण, ते स्वत:च एवढे कन्फर्टटेबल आहेत की ते समोरच्यालाही चटकन कम्फर्टेबल करून टाकतात. त्यामुळे नंतर मला काहीच अडचण नाही आली.


मराठी भाषेचा अभिमान

मराठी भाषा आपली संस्कृती आहे. ती जपणं आपलं कर्तव्य आहे. आपण आपल्या भाषेचा अभिमान बाळगला तरच आपण पुढे जाऊ. परकीय भाषा शिकणे गैर नाही पण मराठी भाषा आपल्याला आलीच पाहीजे. आपण आपल्या भाषेचं महत्त्व पुढच्या पिढीला सांगणं गरजेचं आहे.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा