व्हिस्कीच्या ४१ बाटल्या बाळगल्या, अभिनेता अरमान कोहलीला अटक

बिग बाॅस सीझन ७ पासून चर्चेत आलेला अभिनेता अरमान कोहली याला बेकायदेशीररित्या दारू बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. अरमानला वर्षभरात पोलिसांनी दोनदा अटक केली आहे. याआधी जूनमध्ये लिव्ह इन गर्लफ्रेंड नीरू रंधावा हिला मारहाण केल्याप्रकरणी अरमानला पोलिसांनी अटक केली होती.

नियम काय म्हणतो?

४६ वर्षांच्या अरमानच्या जुहू येथील घरातून एक दोन नव्हे, तर तब्बल ४१ स्काॅच व्हिस्कीच्या बाटल्या महसूल विभाग पोलिसांनी जप्त केल्या. नियमानुसार कुठल्याही व्यक्तीला १२ हून अधिक दारुच्या बाटल्या बाळगता येत नाहीत. एवढंच नाही, तर प्रवासादरम्यान २ पेक्षा जास्त दारूच्या बाटल्या बाळगणं हा देखील गुन्हा आहे.

कायद्यानुसार गुन्हा

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एवढ्या मोठ्या प्रमाणात दारू बाळगल्याप्रकरणी अरमानवर मुंबई लिकर प्रोहेबिशन अॅक्ट ६३ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयात दोष सिद्ध झाल्यावर या कलमाअंतर्गत ३ वर्षांची शिक्षा होऊ शकते.

अरमान कोहली बाॅलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार कोहली यांचा मुलगा आहे. तर त्याची आई निशी कोहली या देखील अभिनेत्री होत्या. काही दिवसांपूर्वी एका महिलेला मारहाणीच्या प्रकरणात पोलिसांनी अरमानची चौकशी केली होती.


हेही वाचा-

अभिनेता अरमान कोहली पुन्हा अडचणीत

अरमान कोहलीविरोधात प्रेयसीची तक्रार मागे


पुढील बातमी
इतर बातम्या