अभिनेता अरमान कोहली पुन्हा अडचणीत


अभिनेता अरमान कोहली पुन्हा अडचणीत
SHARES

मैत्रिणीला मारहाण केल्याप्रकरणी अडचणीत आलेला अभिनेता अरमान कोहली पुन्हा अडचणीत सापडला आहे. महिला सह कलाकाराशी गैरवर्तवणूक केल्याप्रकरणी अरमान आणि त्याचा मित्र दिलीप राजपूत यांच्या विरोधात वर्सोवा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.


कुणी केली तक्रार?

जुहू परिसरात राहणारी तक्रारदार महिला सिने सृष्टीत छोट्या मोठ्या भूमिका करते. त्यामुळे तिची पूर्वीपासून अरमान सोबत ओळख होती. ५ महिन्यांपूर्वी एका पार्टी दरम्यान अरमानने तक्रारदार महिलेची ओळख सहआरोपी दिलीप याच्याशी करून दिली होती. त्यानंतर दोघांमध्ये घनिष्ठ मैत्रीचे संबध तयार झाले.


अश्लील शिवीगाळ

कालांतराने दोघांनी एका प्रोजेक्टमध्ये ५० लाखांची गुंतवणूक केली. मात्र हा प्रोजेक्ट समाधानकारक न झाल्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. त्यावरून २ डिसेंबर रोजी दिलीपने महिलेला फोन करून अश्लील शिवीगाळ केली. तर याबाबत अरमानला ही त्याने कल्पना दिली. त्यानंतर अरमानने पुन्हा महिलेला फोन करून तिच्याशी गैरवर्तवणूक करत अश्लील भाषा वापरली.

या प्रकरणी महिलेने वर्सोवा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलिस अधिक तपास करत आहेत. या पूर्वीही अरमानला त्याच्या मैत्रिणीली मारहाण केल्याप्ररकरणी सांताक्रूझ पोलिसांनी अटक केली होती.हेही वाचा-

मोबाइलमुळे सापडला हत्येतील आरोपी; दिल्लीतून जेरबंद

पैशासाठी दलालाला डांबून अश्लील चित्रीकरणसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा