पैशासाठी दलालाला डांबून अश्लील चित्रीकरण

दलाल २९ नोव्हेंबरला काळबादेवी परिसरात आला असताना आशीषने त्याला गाठून दुकानात नेले. तेथे त्याने पैशांची विचारणा करत दलालाला मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्या दलालाचे कपडे उतरवून त्याच्याकडून कार्यालय साफ करून घेतले.

पैशासाठी दलालाला डांबून अश्लील चित्रीकरण
SHARES

व्यवहाराचे पैसे देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या दलालाचे व्यापाऱ्याने अपहरण करून त्याचे नग्न चित्रीकरण केले.  पैसे न दिल्यास हे चित्रीकरण पसरवून बदनामी करण्याची धमकी देत दलालाला बेदम मारहाण केली. या प्रकरणी दलालाने लोकमान्य टिळक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.


पैसे थकवले

काळबादेवी येथील स्वदेशी मार्केटमध्ये आरोपी व्यापारी आशीष गांधी यांचे कपड्याचे दुकान आहे. मागील वर्षी एका व्यवहारावेळी  दलालाची ओळख आशीषशी झाली होती. काही दिवसांपूर्वी त्याने आशीष यांच्याकडून ९६ हजार रुपयांच्या साड्या घेतल्या. या साड्यांची विक्री केल्यानंतर त्यातील ३ टक्के रक्कम त्याने स्वत: जवळ ठेवली.  साड्या विकत घेणाऱ्याने कालांतराने स्वत:चा व्यवसाय बंद केला. त्यानंतर दलालाने व्यापाऱ्याचे ५० हजार रुपये परत केले. मात्र, उर्वरित पैसे दिले नव्हते.


कपडे उतरवले

त्यानंतर दलाल २९ नोव्हेंबरला काळबादेवी परिसरात आला असताना आशीषने त्याला गाठून दुकानात नेले. तेथे त्याने पैशांची विचारणा करत दलालाला मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्या दलालाचे कपडे उतरवून त्याच्याकडून कार्यालय साफ करून घेतले. त्याचे त्याने मोबाइलमध्ये चित्रीकरणही केले. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी दलालाची रात्री उशिरा सुटका केली. दलालाने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी व्यापाऱ्यावर गुन्हा नोंदवला. हा दलाल मूळचा राजस्थानचा असून तो कर्नाटकच्या मुन्नागुड्डामध्ये वास्तव्यास आहे.हेही वाचा - 

मुलांच्या तस्करीप्रकरणी महिलेला अटक

भोजपुरी सुपरस्टार रवी किशनला बिल्डरने लावला चुना
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा