मुलांच्या तस्करीप्रकरणी महिलेला अटक


मुलांच्या तस्करीप्रकरणी महिलेला अटक
SHARES

गरीब कुटुंबातील सात मुलांना बनावट पासपोर्ट व व्हिसाच्या आधारावर परदेशात नेणाऱ्या महिलेला विमानतळावरून पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेवर अशा प्रकारच्या अनेक गुन्ह्यांची नोंद असून तिच्या अटकेसाठी पोलिसांनी लूक आऊट नोटीसही जारी केली होती. हारू मंजू दत्ता असं या महिलेचे नाव अाहे. तिने या पूर्वी अशा प्रकारे अनेक गरीब मुलांची परदेशात तस्करी केल्याचं निष्पन्न झालं आहे. अधिक तपासासाठी पोलिसांनी तिचा ताबा चेन्नई पोलिसांना दिला आहे.


एकाच पासपोर्टवर प्रवास

खारच्या चुईम बन्सी कुंज अपार्टमेंटमध्ये पतीसोबत राहणाऱ्या हारूने एप्रिल महिन्यात तीन मुलांना आपली मुले असल्याचे भासवून परदेशात नेली. त्यानंतर हारू काही दिवसांनी एकटीच परतली. पुन्हा त्याच महिन्यात दिल्ली विमानतळाहून तिने चार मुले एकाच पासपोर्टवर परदेशात नेली. त्यानंतर ती एकटीच परत आली. त्यावेळी चेन्नई विमानतळावरील इमिग्रेशन अधिकारी थिरू ए. के. सिंग यांच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर त्यांनी या महिलेची चौकशी केली.  गुन्हा निष्पन्न झाल्यानंतर हारू विरोधात सेंट्रल गुन्हे शाखेत गुन्हा नोंदवला.


युकेतून भारतात पलायन

 शनिवारी पुन्हा हारू काही मुलांना विमानतळावर घेऊन आली होती. त्यावेळी पासपोर्ट तपासताना तिच्या विरोधात नोंदवण्यात आलेला गुन्हा पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. चौकशीत आतापर्यत परदेशात अनेक मुले इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या मदतीने नेल्याची कबुली तिने दिली आहे. या प्रत्येक मुलामागे ती सहा ते सात लाख रुपये घेत असे. तिच्या विरोधात यूके मध्येही गुन्हा असून तेथे जामिनावर सुटल्यानंतर ती भारतात पळून आल्याचे तिने पोलिसांना सांगितले.हेही वाचा - 

भोजपुरी सुपरस्टार रवी किशनला बिल्डरने लावला चुना
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा