६५ वर्षांवरील कलाकार आणि क्रू सदस्यांना शूटिंगची परवानगी

चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटिटि उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना चित्रीकरणाच परवानगी देण्यात आली आहे. कोवीड-19 च्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती पूर्ण काळजी घेऊन चित्रीकरण करण्यास परवानगी देण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली.

कोविड-19 पार्श्वभूमीवर चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका / ओटिटि यांच्या चित्रिकरणाची कामे, नियंत्रित स्वरुपात पुन्हा सुरु करण्याकरीता; मार्गदर्शक सूचना, शासन निर्णय दिनांक 30 मे 2020 आणि दिनांक 23 जून 2020 अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या होत्या. या सूचनांमध्ये, ६५ वर्षावरील कोणत्याही कलाकार / क्रू सदस्यांना चित्रीकरण स्थळावर परवानगी दिली जाणार नाही, अशी अट ठेवण्यात आली होती.

तथापि, मा. उच्च न्यायालानं सदरील अट रद्द करण्याचा निर्णय दिला आहे. आता ६५ वर्षांवरील कलाकार आणि क्रू सदस्यांना चित्रीकरणात सहभागी होण्याची मुभा राहील अशी माहितीही देशमुख यांनी दिली आहे. या निर्णयामुळे चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका / ओटिटि उद्योग या क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार आणि तंत्रज्ञ यांना प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा, सांस्कृतिक कार्य विभागाचे अमित देशमुख यांनी व्यक्त केली आहे.


हेही वाचा

संजय दत्त कोकिलाबेन रुग्णालयात दाखल

गुंजन सक्सेनाः द कारगिल गर्ल' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात

पुढील बातमी
इतर बातम्या