Advertisement

गुंजन सक्सेनाः द कारगिल गर्ल' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात

बुधवारी नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला 'गुंजन सक्सेना' हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

गुंजन सक्सेनाः द कारगिल गर्ल' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात
SHARES

बुधवारी नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला 'गुंजन सक्सेना' हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. भारतीय वायुसेनेला चित्रपटात 'अनावश्यक नकारात्मक' दाखवल्याबद्दल तक्रार केली गेली आहे. IAF नं सेन्सॉर बोर्डाला एक पत्र पाठवलं आहे. ज्यामध्ये काही दृश्यांवर आक्षेप घेण्यात आला आहे.

चित्रपट IAF अधिकारी गुंजन सक्सेना यांच्या जीवनावर आधारित आहे. १९९९ च्या कारगिल युद्धात भाग घेणाऱ्या गुंजन सक्सेना पहिल्या महिला पायलट होत्या. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर यांच्या धर्मा प्रॉडक्शननं केली आहे. वायुसेनेपूर्वी संरक्षण मंत्रालयानंही वेब सीरिजमध्ये सैन्य दाखवण्याबाबत आक्षेप नोंदवला आहे.

वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, एअरफोर्सच्या एका अधिकाऱ्यानं म्हटलं आहे की, 'गुंजन सक्सेना' चित्रपटाच्या काही दृश्यांवर आक्षेप घेत वायुसेनेनं सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्‍म सर्टिफिकेशन (CBFC) यांना पत्र लिहलं आहे. यामध्ये चित्रपटातील काही दृश्यांवर अक्षेप घेतला आहे.

"गेल्या महिन्यात, संरक्षण मंत्रालयानं CBFC सांगितलं होतं की, लष्कराचवर आधारीत चित्रपट, माहितीपट किंवा वेब सिरीजसाठी प्रॉडक्शन हाऊसना प्रथम मंत्रालयाकडून ना-हरकत प्रमाणपत्र घ्यावं लागेल.

भारतीय लष्कराचे सैनिक आणि त्यांचा गणवेश बर्‍याच वेब सीरीज/ चित्रपटांमध्ये 'अपमानास्पद पद्धतीनं' दाखवण्यात आल्याच्या काही तक्रारी संरक्षण मंत्रालयाला मिळाल्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या महिन्यात यासंदर्भात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला एक पत्रही पाठवण्यात आलं होतं.

'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' मध्ये जान्हवी मुख्य भूमिकेत आहे. शरण शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात पंकज त्रिपाठी, अंगद बेदी, विनीत कुमार, मानव विज आणि आयशा रझा यांच्याही मुख्य भूमिका आहेत.हेही वाचा


संबंधित विषय
Advertisement