उदय चोप्रा आणि नर्गिस फाख्री करणार लग्न?

बॉलिवूड अभिनेता उदय चोप्रा आणि अभिनेत्री नर्गिस फाख्री लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. यापूर्वी त्यांच्या रिलेशनशिपच्या अनेक चर्चा होत्या. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात दुरावा आल्याचं बोललं जात होतं. पण पुन्हा एकदा हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. पण यासंदर्भात कुठलीच अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.

नर्गिस अनेकदा उदयला भेटण्यासाठी न्यूयॉर्कहून मुंबईला येत असल्याचं देखील बोललं गेलंय. एवढचं नाही तर जुहू येथील यश चोप्रा यांच्या बंगल्यात काही दिवस नर्गिस राहिली आहे. शिवाय उदयची आई पॅमेलासोबत सुद्धा नर्गिसनं वेळ घालवला आहे. पण या दोघांनी कधीच उघडपणे त्यांच्या नात्याचा स्वीकार केला नाही.


हेही वाचा

'सैराट'चा हिंदी रिमेक 'धडक'चं शूटिंग सुरू

पुढील बातमी
इतर बातम्या