Advertisement

'सैराट'चा हिंदी रिमेक 'धडक'चं शूटिंग सुरू


'सैराट'चा हिंदी रिमेक 'धडक'चं शूटिंग सुरू
SHARES

मराठी चित्रपट 'सैराट'ला प्रचंड यश मिळालं. चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर धर्मा प्रॉडक्शननं 'सैराट'चा हिंदी रिमेक करण्याचं ठरवलं. त्यानुसार करण जोहर पुढच्या वर्षी 'धडक' चित्रपट घेऊन येणार आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर आणि ईशान खत्तर हे दोन नवे चेहरे सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. नुकतेच या दोघांनी उदयपुरमध्ये या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. धर्मा प्रॉडक्शननं त्यांच्या सोशल मीडिया अकांऊटवर चित्रीकरणाला सुरुवात झाल्याची माहिती दिली आहे.काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. 'धडक'च्या फर्स्ट लूकमध्ये जान्हवी आणि ईशान दिसत आहेत. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचे पाहायला मिळत आहे. पोस्टरवर 'धडक' या नावावर रक्ताचे शिंतोडे उडाल्याचे दाखवण्यात आले आहे. ६ जुलै २൦१८ मध्ये 'धडक' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'सैराट'वर आधारीत कथानक असल्यानं प्रेक्षकांना या चित्रपटाविषयी फार उत्सुकता आहे.ईशान आणि जान्हवी या दोघांसाठी हा चित्रपट फार महत्त्वाचा आहे. दोघांकडूनही प्रचंड अपेक्षा आहेत. जान्हवी ही श्रीदेवीची मुलगी आहे. तर ईशान शाहीद कपूरचा भाऊ आहे. सेलिब्रिटी कुटुंबातून हे दोन्ही कलाकार असल्यानं त्यांच्यावर तेवढेच दडपण आहे.


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा