बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्डद्वारे 'या' अभिनेत्रीची एन्ट्री

  • मुंबई लाइव्ह टीम & संचिता ठोसर
  • मनोरंजन

बिग बॉस मराठी सुरू होऊन आता जवळपास एक महिना पूर्ण होत असताना वाईल्ड कार्डची प्रक्रिया सुरू झाली असून घरात कुणाला प्रवेश मिळणार याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता लागून होती. पण आता ते नाव जाहीर झालं आहे.

कोणाला मिळाला प्रवेश? 

तीचं नाव ऐकलं की आदरयुक्त भीती वाटते, तीच्या आवाजात प्रेम आणि दरारा असतोच... भल्याभल्यांना ती सरळ करते... असं म्हणतं बिग बॉस मराठीच्या घरात हर्षदा खानविलकर एन्ट्री करणार आहे. 

 

आजच्या भागात होणार एन्ट्री

आजपर्यंत बिग बॉसच्या घराचे दार उघडले ते सदस्य एलिमिनेट झाल्यावर. यावेळी सगळ्यांच्याच डोळ्यांत पाणी असतं. पण गुरुवारी मात्र बिग बॉसच्या घराच दार नवीन सदस्याच्या स्वागतासाठी उघडण्यात येईल. या नवीन सदस्याच्या म्हणजेच अक्कासाहेबांच्या एन्ट्रीमुळे सगळेच खूष होणार आहेत. हर्षदा खानविलकर बिग बॉसच्या घरातील अनेक सदस्यांची मैत्रिण आहे.

हर्षदा आहे सर्वांची मैत्रीण

पुढचं पाऊल या मालिकेतून हर्षदा खानविलकर घराघरात पोहचली. या मालिकेमुळे जुई गडकरी आणि अस्ताद काळे या दोघांशी हर्षदाचं जवळचं नातं आहे. तर हर्षदा रेशम टिपणीसची जवळची मैत्रिण आहे. त्यामुळे हर्षदाच्या एन्ट्रीमुळे बिग बॉसच्या घरात रंगलेलं ग्रुपिझम आणखी रंगणार की आता नवीन ग्रुप तयार होणार? हे बघणं रंजक ठरणार आहे.


हेही वाचा - 

बिग बॉस मराठीमध्ये रंगणार विकेण्डचा डाव!

‘बिग बॉस’फेम पूजा मिश्राचा नवीन रिअॅलिटी शो

पुढील बातमी
इतर बातम्या