Advertisement

‘बिग बॉस’फेम पूजा मिश्राचा नवीन रिअॅलिटी शो


‘बिग बॉस’फेम पूजा मिश्राचा नवीन रिअॅलिटी शो
SHARES

रिअॅलिटी शोमधील स्टार आणि सध्या निर्माती झालेली पूजा मिश्रा ही नवीन रिअॅलिटी शो ‘स्पेअर मी द क्रॅब मेंटॅलिटी!’ घेऊन येत आहे. या शोमधील विजेत्याला आगामी चित्रपट ‘जुद’मध्ये अभिनय करण्याची संधी मिळणार आहे.
 


या शोची केली निर्मिती

पूजा सध्या वेबसिरीज ‘लव्हसूत्र’ची निर्मिती करत असून सध्या ‘हंगामा प्लेअॅप’वर प्रसारित होत आहे. 4 महिने ‘इ 24’ या बॉलिवूड वृत्तवाहिनीवर यशस्वीपणे ‘अभी तो पार्टी शुरू हुई है’ या टीव्ही शोची यशस्वी निर्मिती केल्यावर या नवीन रिअॅलिटी शोच्या माध्यमातून आता करमणुकीचा हा सिलसिला आणखीच गडद होणार आहे. या मालिकेच्या प्रत्येक भागात नवनवीन परीक्षक येणार आहेत. हे परीक्षक वेगवेगळ्या क्षेत्रातील असतील.
 

कलाकारांसाठी नवी संधी

नव्याने चित्रपटांमध्ये अभिनय करू इच्छिणाऱ्यांसाठी ही अत्यंत नम्र स्वभावाची निर्माती नवनवीन संधी उपलब्ध करून देवू इच्छिते. त्याचबरोबर मनोरंजन विश्वातील प्रस्थापित चेहऱ्यांनाही येथे संधी मिळणार आहे. या निर्मातीच्या निर्मिती कंपनीची टॅगलाईन आहे - क्रॅकिंग द क्रॅब मेंटॅलिटी! यू गो गर्ल! आणि हेच ब्रीदवाक्य प्रत्यक्षात उतरवण्याचं उद्दिष्ट्य घेऊन ही निर्मिती होत आहे. www.poojamisra.wixsite.com/realityshowDescription: https://ssl.gstatic.com/ui/v1/icons/mail/images/cleardot.gif  वर लॉगिंग करून नाव नोंदवू शकता.

संबंधित विषय
Advertisement