कोरोनाविरुद्ध लढ्यात बिग बींचं योगदान, 'अशी' केली मदत

महानायक बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी सुद्धा आता कोरोनाविरुद्ध (Coronavirus) लढ्यात आपलं योगदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ऑल इंडिया चित्रपट कर्मचारी संस्थेशी संबंधित तब्ब्ल १ लाख रोजंदारी मजुरांना एका महिन्याचा किराणा वाटणार असल्याची घोषणा अमिताभ यांनी केली आहे. बिग बींच्या या निर्णयाला सोनी नेटवर्क इंडिया (Sony Network India) आणि कल्याण ज्वेलर्स (Kalyan Jewellers) कडूनही पाठिंबा दर्शवण्यात आला आहे.

"आपण ज्या परिस्थितीत आता अडकलो आहोत त्याला एकजुटीनं सामना करण्याची आवश्यकता आहे. अशावेळी अमिताभ बच्चन यांनी घेतलेल्या या निर्णयाचे आपण समर्थन करतो, आणि त्यानुसार १ लाख घरांना आमच्या वतीनं मोफत किराणा देण्यात येईल" अशी अधिकृत घोषणा सोनी नेटवर्क आणि कल्याण ज्वेलर्सच्या वतीनं करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, देशातील महत्वाच्या आणि मोठ्या किराणा मालाच्या दुकानांना जोडून त्यांचे काही डिजिटल बारकोड फिल्म असोसिएशनच्या संबंधित कर्मचारी आणि मजूर वर्गाला वाटण्यात आले आहेत. ज्यावरून या गरजूंना संबंधित स्टोर मधून खरेदी करण्यात येणार आहे. तर काहींना शक्य असेल तितकी आर्थिक मदत सुद्धा केली जाणार आहे, असंही सोनी आणि कल्याण ज्वेलर्सच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. दरम्यान ही मदत नेमकी कधीपर्यंत पोहचेल याबाबत अजूनतरी स्पष्ट माहिती मिळालेली नाही.


हेही वाचा

'साराभाई Vs साराभाई' आणि 'खिचडी' तुम्हाला पुन्हा हसवणार

Coronavirus : 'अंग्रेजी मीडियम' चित्रपट आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर

पुढील बातमी
इतर बातम्या