Advertisement

'साराभाई vs साराभाई' आणि 'खिचडी' तुम्हाला पुन्हा हसवणार

'खिचडी' आणि 'साराभाई vs साराभाई' पुन्हा सुरू होणार असल्याची अधिकृत घोषणा देखील सोशल मीडियावर करण्यात आली आहे.

'साराभाई vs साराभाई' आणि 'खिचडी' तुम्हाला पुन्हा हसवणार
SHARES

संपूर्ण देशभरात कोरोनामुळे (Coronavirus) गंभीर वातावरण निर्माण झाले आहे. लॉकडाऊनमुळे घरातच राहावं लागत असल्यानं मानसिक ताण देखील वाढतो आहे. अशा परिस्थितीत एकेकाळी भारतीय टेलिव्हिजनवर राज्य करणाऱ्या काही जुन्या मालिका पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. दूरदर्शननं 'रामायण', 'महाभारत' पुन्हा सुरू केलं. बच्चेकंपनीची आवडती मालिका शक्तिमानही आता पुन्हा पाहायला मिळतेय.

आता या यादीत आणखी दोन नावं जोडली गेली आहेत. या कॉमेडी मालिकांनी ९० चं दशक खूप गाजवलं होतं. तर या प्रसिद्ध कॉमेडी सिरियल्स म्हणजे, 'खिचडी' (khichdi) आणि (sarabhai VS sarabhai) 'साराभाई vs साराभाई'! या दोन्ही मालिका पुन्हा सुरू होणं म्हणजे अनेकांसाठी पर्वणीच आहे. गेल्या काही दिवसांपासून हे दोन्ही कार्यक्रम पुन्हा सुरू करावेत अशी मागणी जोर धरू लागली होती. त्यानंतर समोर आलेल्या वृत्तानुसार हे दोन्ही शो टीव्हीवर जोरदार कमबॅक करणार आहेत. 'खिचडी' आणि 'साराभाई vs साराभाई' पुन्हा सुरू होणार असल्याची अधिकृत घोषणा देखील सोशल मीडियावर करण्यात आली आहे.

'साराभाई vs साराभाई' ६ एप्रिलपासून सुरू होणार असून रोज सकाळी १० वाजता या मालिकेचं प्रसारण होणार आहे. सतीश शाह, रतना पाठक, राजेश कुमार, सुमीत राघवान आणि रूपाली गांगुली यांची मुख्य भूमिका असणारी ही सिरियल २००४ मध्ये स्टार वन या चॅनेलवर सुरू झाली होती.

तर 'खिचडी' सुद्धा ६ एप्रिलपासूनच सुरू होणार आहे. या मालिकेची वेळ दररोज सकाळी ११ वाजता असणार आहे. प्रिया पाठक, वंदना पाठक, राजीव मेहता, जमनादास मजेठिया यांची प्रमुख भूमिका असणारी ही मालिका २००२ मध्ये सुरू झाली होती.

प्रेक्षकांना निखळ आनंद देणाऱ्या या मालिका होत्या. त्यांनंतर या मालिकांचे आलेले सिक्वेल किंवा त्यांच्यावर बनलेले चित्रपट सुद्धा इतके लोकप्रिय झाले नाहीत. प्रेक्षकांनी यामधील कलाकारांना आणि जुन्याच कथानकाना जास्त प्रेम दिलं आहे. आता पुन्हा या मालिका सुरू होत असल्यानं अनेकांनी सोशल मीडियावर त्यांता आनंद व्यक्त केला आहे.



हेही वाचा

रामायण ठरलं सुपरहिट, TRP मध्ये रचला इतिहास

ओल्ड इज गोल्ड! रामायणच नाही 'या' ९ मालिकाही करतील तुमचं मनोरंजन

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा