ओल्ड इज गोल्ड! रामायणच नाही 'या' ९ मालिकाही करतील तुमचं मनोरंजन

'रामयण'सोबत शक्तीमान (Shaktiman), नुक्कड (Nukkad), देख भाई देख (Dekha Bhai Dekha) अशा मालिका पाहायच्या आहेत? मग तुम्ही 'इथं' पाहू शकता.

ओल्ड इज गोल्ड! रामायणच नाही 'या' ९ मालिकाही करतील तुमचं मनोरंजन
SHARES

जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. महाराष्ट्रात देखील दिवसेंदिवस कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. महाराष्ट्रात रुग्णांचा आकडा १५९च्या घरात गेला आहे. तर मुंबईतील कोरोना ग्रस्तांचा आकडा ९१वर गेला आहे. तर मुंबईत मृतांचा आकडा ५वर गेला आहे. त्यामुळे सध्या चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून केंद्र आणि राज्य सरकारनं पूर्णत: लॉक डाऊन केलं आहे. फक्त अत्यावश्यक सेवा म्हणजे किराणा मालाचं दुकानं, दुध विक्री, भाजी विक्री सुरू आहे. याशिवाय नागरिकांना घरातच रहायचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. त्यामुळे नागरिक घरातच राहून नागरिक कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहेत.

नुकतीच भाजपा नेते आणि माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रामायण (Ramayan) ही मालिका दुरदर्शनवर (Doordarshan) पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचं स्वागत केलं. पण काहींनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत फक्त रामायणच (Ramayan) का? आम्हाला जुन्या मालिका जश्या की, शक्तीमान (Shaktiman), नुक्कड (Nukkad), देख भाई देख (Dekha Bhai Dekha) अशा मालिका देखील पाहायच्या आहेत. आज मी तुम्हाला याच मालिकांची माहिती देणार आहे आणित्या तुम्ही कुठे पाहू शकता हे सांगणार आहोत.


१) शक्तीमान (Shaktiman)

शक्तिमान हे प्रसिद्ध "शक्तिमान" या दूरदर्शन मालिकेतील एक पात्र आहे. शक्तिमान ही दूरदर्शन मालिका प्रथम १३ सप्टेंबर १९९७ रोजी प्रसारित करण्यात आली. मुकेश खन्ना यांनी शक्तिमानची भूमिका साकारली होती. पंचमहाभूतां म्हणजे हवा, जमीन, अग्नि, वायु , अवकाशपासून मिळालेल्या शक्तींपासून शक्तिमानची निर्मिती होते. त्यास पृथ्वीवरील वाईट शक्तींचा नायनाट करण्याचं काम महर्षींनी सोपवलेलं असतं. शक्तिमान हा दिवसा सर्व लोकांत गुप्त प्रकारे "पंडित गंगाधर विद्याधर मायाधर ओंकारनाथ शात्री" या नावानं पत्रकाराच्या भूमिकेत वावरत असतो. गरज असेल तेव्हा तो शक्तीमानचं रूप घेतो.

कुठे पाहाल?

यु ट्यूबवर याचे एपिसोड तुम्हाला पाहता येतील.


२) नुक्कड (Nukkad)

दिग्दर्शक कुंदन शहा यांची ‘नुक्कड’ ही मालिका भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात कुशल ठरली. दुरदर्शनवर प्रसारीत होणारी ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. फुटपाथवर राहणाऱ्यांच्या आयुष्यावर बेतलेली ‘नुक्कड’ प्रचंड लोकप्रिय ठरली.

‘नुक्कड’मधल्या रस्त्यावर राहणाऱ्या पात्रांच्या माध्यमातून शहा यांनी सामान्य तरुण माणसांचे एक उत्तम अंतरंग, त्यातील चांगुलपणा प्रभावीपणे समोर आणला होता. या मालिकेतील ,गुरू ,टीचर ,खोपडी ,गणपत हवालदार या भूमिका काहींच्या लक्षात असतील.

कुठे पाहाल?

नुक्कडचे सगळे एपिसोड तुम्ही यु ट्यूबवर पाहू शकता.


३) देख भाई देख (Dekh Bhai Dekh)

दूरदर्शनवरील ही मालिका अनेक कुटुंबाची आवडती मालिका होती. ६ मे १९९३ रोजी ही मालिका प्रदर्शित करण्यात आली. आनंद महेंद्रो दिग्दर्शित आणि जया बच्चन निर्मित ही मालिका फॅमेली कॉमेडी ड्रामा स्वरुपातील होती. या मालिकेतील कलाकारांची फळी ही तितकीत तगडी होती.

मालिकेत मुख्य भूमिकेत शेखर सुमन, नवीन निश्चल, फरिदा जलाल, भावना भावसार, विशाल धिंगरा, अमर उपाध्याय, विशाल धिंगरा अशी स्टारकास्ट होती. या मालिकेचे एकूण 65 भाग प्रदर्शित करण्यात आले. आजही या मालिकेचं टायटल ट्रॅक अनेकांच्या लक्षात आहे.

कुठे पाहाल?

यु ट्यूबवर याचे ६५ एपिसोड तुम्ही पाहू शकता.


४) ये जो है जिंदगी ( Ye Jo Hai Zindagi)

१९८४ साली ही मालिका दुरदर्शनवर प्रसारीत व्हायची. लेखक शरद जोशी यांनी लिहलेली ही मालिका कुंदन शहा यांनी दिग्दर्शित केली आहे. कौटुंबिक ड्राम्यावर ही मालिका आधारीत आहे. नवरा- बायको यांच्यातील प्रेम, भांडण, अडचणी हे सर्व तुम्हाला यात पाहायला मिळेल.

मालिकेच्या २४ एपिसोडमध्ये रणजीत, त्याची बायको, साला राजा आणि शेजारी भट्टाचार्य- मंदिरा दाखवण्यात आले आहेत. यात सतिश शहानं देखील वेगवेगळ्या भूमिका दाखवल्या आहेत. एपिसोड २५ ते ४४ मध्ये राजा त्याची काकी आणि नोकरावर ही मालिका केद्रीत करण्यात आली. त्यानंतर पुन्हा ४५ ते ५५ एपिसोडमध्ये रणजीत त्याची बायको आणि राजा पाहायला मिळतात.

कुठे पाहाल?

यु ट्यूबवर याचे एपिसोड पाहता येतील.


५) श्रीमानं श्रीमती (Shriman Shrimati)

दूरदर्शन वर प्रसारीत होणारी ही मालिका १९९४ ते १९९९ पर्यंत सुरु झाली. या मालिकेतील केकूजी तुम्हाला आठवले की नाही? जतीन कनराकारीया, रिमा लागू, अर्चना पुरणसिंग आणि राकेश बेदी या मालिकेत मुख्य भूमिकेत होते. अर्चना पुरणसिंगनं यामध्ये प्रेमा शालिनी नावाची भूमिका साकारली होती.

अर्चना याच एक अभिनेत्री दाखवली असते. जिच्या मागे केशव म्हणजेच जतीन कनकारीया लागलेला असतो. प्रेमाला पटवण्यासाठी केशव फार प्रयत्न करत असतो. पण दिलरुबा म्हणजे प्रेमा शालिनीचा नवरा त्याला चांगलाच पुरुन उरत असतो. अशी एकूणच कॉमेडी स्वरुपातील ही मालिका होती.

कुठे पाहाल?

यु ट्यूबवर याचे देखील एपिसोड पाहायला मिळतील.


६) हम पाच (Hum Paanch)

१९९५ साली या मालिकेचा पहिला एपिसोड आला. त्यानंतर २००६ पर्यंत ही मालिका सुरु होती. आनंद माथुर ( अशोक सराफ) यांच्या ५ मुली आणि त्यांची दुसरी पत्नी यांच्यावर ही मालिका आधारीत होती. या मालिकेतला ट्विस्ट असा होती की, त्यांची पहिली पत्नी प्रिया तेंडुलकर जिचं निधन झालं आहे.

 ती पण फोटोतून बोलताना या मालिकेत दाखवण्यात आली आहे. या मालिकेत विद्या बालन, भैरवी रायचुरा,शोमा आनंद, वंदना पाठक, राखी टंडन, अमिता नगीना प्रमुख भूमिकेत आहे.

कुठे पाहाल?

ही मालिका देखील यु ट्यूबवर उपलब्ध आहे.


७) कॅप्टन व्योम

जर तुम्ही मिलिंद सोमणचे चाहते असाल तर तुम्हाला मिलिंदची ही मालिका नक्कीच माहीत असेल. १९९८ साली ही मालिका सुरु झाली. साधारण एक वर्ष ही मालिका सुरु होती. या मालिकेचे एकूण ५४ एपिसोड प्रदर्शित करण्यात आले. सायन्स फिक्शनवर आधारीत अशी ही मालिका होती. त्यामुळेच ती अनेक लहानमुलांना आवडणाऱ्या मालिकांमध्ये या मालिकेचा समावेश होता.

कुठे पाहाल?

ही मालिका यु ट्यूबवर प्रसारीत होते.


८) तू तू मै मै

सासू- सुनेच्या नात्यातील गोडवा आणि भांडण दाखवणारी मालिका म्हणजे तू तू मैं मै. २६ जुलै १९९४ रोजी ही मालिका दूरदर्शनवर प्रदर्शित करण्यात आली. तुम्ही ही मालिका पाहिली असेल तर तुम्हाला बहुराणी…. हा शब्द नक्कीच आठवेल.

रिमा लागू आणि सुप्रिया पिळगावकर या मालिकेत मुख्य भूमिकेत होते. तब्बल 6 वर्ष ही मालिका सुरु होती. या मालिकेला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

कुठे पाहाल?

तू तू मै मै ही मालिका यु ट्यूवर प्रसारीत होते.


९) मालगुडी डेज

आर के नारायण यांच्या कार्यावर आधारित मालगुडी डेज ही सर्व मालिकांपैकी एक खूप लोकप्रिय झाली. त्या काळातील मुलांवर त्याचा खोलवर परिणाम झाला. या मालिकेत स्वामी अँड फ्रेंड्स आणि मिठाई विक्रेता यासारख्या लघुकथा आणि कादंबऱ्यांचा समावेश होता. ही सीरियल हिंदी आणि इंग्रजी भाषेत तयार केली गेली होती.

१९८७ मध्ये पद्मराग फिल्म्सच्या टीएस नरसिम्हन यांनी निर्मित मालगुडी डेजचे दिग्दर्शन दिवंगत कन्नड अभिनेते आणि दिग्दर्शक शंकर नाग यांनी केलं होतं. या मालिकेचे चित्रीकरण कर्नाटकच्या शिमोगा जिल्ह्यातील अगुम्बे इथं करण्यात आलं. या मालिकेचं संगीत दिग्दर्शक व्हायोलिन वादक एल. वैद्यनाथन यांनी केलं होतं.

कुठे पाहाल?

यु ट्यूबवर या मालिकेचे सर्व एपिसोड पाहता येतील.
हेही वाचा

Coronavirus Lockdown : घर बसल्या फुल टू मनोरंजन, पाहा या ५ मराठी वेबसिरीज

'या' वेळेत प्रसारीत होणार 'रामायण'

संबंधित विषय