Advertisement

'या' वेळेत प्रसारीत होणार 'रामायण'

केंद्र सरकारनं एकेकाळचा सर्वात लोकप्रिय टीव्ही शो रामायण (Ramayan) पुन्हा प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे.

'या' वेळेत प्रसारीत होणार 'रामायण'
SHARES

कोरोना व्हायरसनं (Coronavirus) आता भारताला विळखा घालायला सुरुवात केली आहे. या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आलं. त्यामुळे आता घरी राहून नेमकं काय करावं? असा प्रश्न सर्व लोकांच्या मनात आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीलाही या Covid- 19 व्हायरसचा फटका बसताना दिसत आहे. सिनेमांचं शूटिंग थांबवण्यात आलं आहे. नवे सिनेमा प्रदर्शित होत नाही आणि डेलिसोपचे शूटिंग सुद्धा बंद पडल्यानं टीव्हीवर काय कार्यक्रम पाहावे हा प्रश्न सध्या निर्माण होताना दिसत आहे.

मालिकाची शूटिंग बंद पडल्यानं सध्या अनेक लोकप्रिय मालिका बंद होण्याच्या मार्गावर आहेत. कारण त्यांच्याकडे नवे एपिसोड नाहीत. त्यामुळे आता जवळपास सर्वच टीव्ही चॅनेल्सवर मालिकांचे रिपीट टेलिकास्ट सुरू आहेत. अशा आता केंद्र सरकारनं एकेकाळचा सर्वात लोकप्रिय टीव्ही शो रामायण (Ramayan) पुन्हा प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यांची माहिती त्यांच्या ट्वीटरवरुन दिली.

प्रकाश जावडेकर यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिलं, सर्वांना सांगताना आनंद होत आहे की, लोकांच्या मागणीनुसार रामायण या लोकप्रिय टीव्ही रिटेलिकास्ट २८ मार्चपासून डीडी नॅशनलवर रोज एक एपिसोड सकाळी ९ ते १० आणि पुन्हा रात्री ९ ते १० या वेळेत करण्यात येणार आहे.

रामायण ही दूरदर्शनच्या एकेकाळची सर्वाधिक लोकप्रिय टीव्ही मालिका आहे. या मालिकेत काम करणाऱ्यांनी इतिहास घडवला आणि या मालिकेत काम करणाऱ्य़ा कलाकारांची त्यावेळी वेगळीच चर्चा होती. नुकतीच रामायणाची स्टारकास्ट द कपिल शर्मा शोमध्ये आली होती. कपिल शर्माशी गप्पा मारताना प्रत्येकानं खूप धम्माल केली.

रामायण त्या काळातील अशी एक टीव्ही मालिका होती जेव्हा टीव्हीवर देवाची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना खरोखरच रामचं रूप मानलं जात होतं. हे कलाकार ज्या गावात किंवा खेड्यात-जायचे तेथे प्रत्येक गावात त्यांचा देवासारखं स्वागत केलं जात होतं.




हेही वाचा

हृतिक रोशनकडून पालिकेला २० लाखांची आर्थिक मदत

Coronavirus : कनिका कपूरची तिसरी टेस्टही पॉझिटिव्ह

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा