Advertisement

Coronavirus : कनिका कपूरची तिसरी टेस्टही पॉझिटिव्ह

कनिका कपूर ही सध्या लखनऊच्या संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल आहे.

Coronavirus : कनिका कपूरची तिसरी टेस्टही पॉझिटिव्ह
SHARES

बॉलिवूड सिंगर कनिका कपूरबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. अलीकडेच तिची तिसरी वैद्यकीय चाचणी झाली आहे जी पॉझिटिव्हआली आहे. यापूर्वी कनिका कपूरची दुसरी वैद्यकीय चाचणीही पॉझिटिव्ह आली. त्यामुळे तिच्या आणि कुटुंबियांच्या चिंतेत नक्कीच भर पडली आहे.

माध्यमांच्या वृत्तानुसार, कनिका कपूर ही सध्या लखनऊच्या संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल आहे. बॉलिवूड गायिका कनिका कपूर तसंच तिचा मित्र ओजस देसाई यांचा वैद्यकीय अहवाल समोर आला आहे. कनिका कपूरचा हा मित्र तिच्याबरोबर हॉटेल ताजमध्ये दोन दिवस राहिला होता आणि त्याचबरोबर तो बरेच दिवस बेपत्ता होता.

पिंकविलाच्या अहवालानुसार कनिका कपूरचा मित्र ओजस देसाई यांनी आपल्या वैद्यकीय अहवालाबद्दल सांगितलं की, "मी मुंबईतील कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये माझी कोरोनव्हायरस टेस्ट केली होती जी नकारात्मक आली आहे." कनिका कपूर व्यतिरिक्त तिच्या संपर्कात आलेल्या २६२ लोकांपैकी ६० जणांचे वैद्यकीय अहवाल नकारात्मक आले आहेत. बॉलिवूड गायिका लंडनहून मुंबईत परत होती. त्यानंतर दोन दिवसांनी ती लखनऊला गेली आणि बर्‍याच पार्टीतही सहभागी झाली.

उत्तर प्रदेशमध्ये कनिका कपूर यांच्या दुर्लक्षाबद्दल अनेक एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत तिच्यावर ३ एफआयआर दाखल केल्या आहेत. गायक कनिका कपूरचा जन्म भारतात झाला होता. पण आता ती इंग्लंडची रहिवासी आहे. १९९७ मध्ये जेव्हा कनिका १८ वर्षांची होती तेव्हा तिचे एनआरआय व्यावसायिका राज चांधोकशी लग्न झाले होते आणि त्यांना तीन मुलंही आहेत. परंतु २०१२ मध्ये तिचा घटस्फोट झालाय.

कनिका कपूर यांनी 'चिट्टिया कलैयां (रॉय)', 'लवली', 'देसी लुक (एक पहली लीला)', 'गर्लफ्रेंड (दिलवाले)', 'दा दा दसे (उडता पंजाब)' अशी गाणी गायली आहेत.



हेही वाचा

तुम्हीच खरे थलायवा! ५० लाखांची मदत

पुन्हा एकदा हसवण्यास तयार फुकरे टिम

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा