Advertisement

तुम्हीच खरे थलायवा! ५० लाखांची मदत

भारतीय सुपरस्टार रजनीकांत यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले की तेच खरे 'थलायवा' आहेत.

तुम्हीच खरे थलायवा!  ५० लाखांची मदत
SHARES

भारतीय सुपरस्टार रजनीकांत यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले की तेच खरे 'थलायवा' आहेत.

देशातील सद्यस्थिती पाहता दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील दैनंदिन वेतन कामगारांसाठी ५० लाख देण्याचं त्यांनी ठरवलं आहे. कोरोनाव्हायरसच्या उद्रेका दरम्यान, भारतीय चित्रपटसृष्टी पूर्ण लॉकडाउनमध्ये आहे. पण यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या कामगारांचा विचार करूनच रजनिकांत यांनी हा निर्णय घेतला.

रजनीकांत यांच्या व्यतिरिक्त दक्षिणेकडून सूर्या, कार्ती आणि विजय सेतूपती आणि इतर अनेक चित्रपट निर्मातेही कामगारांच्या मदतीला आले आहेत. विजय सेतूपथी यांनी १० लाख तर सूर्या, कार्ती यांनी त्यांचे वडील शिवकुमार यांच्यासह १० लाखांची देणगी दिली आहे. लवकरच अभिनेता शिवकार्थिकेयन यांनीही १० लाख रुपयांची देणगी दिली.

सरकारनं जाहीर केलेल्या प्रोटोकॉलनुसार, कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व थिएटर्स बंद ठेवण्यात आली आहेत. शूटिंग देखील संपूर्ण भारतभर ठप्प झाली आहे. यामुळे दररोज काम करणाऱ्या अनेकांच्या आयुष्यात अडथळा निर्माण झाला आहे. या संकटाचा विचार करून फिल्म एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ साउथ इंडियाचे अध्यक्ष आरके सेलवमनी यांनी यापूर्वी दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील कलाकारांना मदत करण्यासाठी आवाहन केलं आहे.

अभिनेते पार्थीपान आणि प्रकाश राज यांनी प्रत्येकी २५ किलो तांदळाचं वाटप केलं आहे. इतर अनेक सेलिब्रिटीज देखील आपापल्यापरीनं मदत करत आहेत. कारण तेच त्यांच्या चित्रपटांच्या यशासाठी मेहनत घेत असतात.

सिरुथाई शिव दिग्दर्शित रजनीकांत यांचा आगामी ‘अण्णाथे’ हा चित्रपट कोरोनाव्हायरसच्या उद्रेकामुळे रखडला आहे. यावर्षी दिवाळीदरम्यान रिलीज होण्याची अपेक्षा होती पण सद्यस्थिती पाहता उशीर होऊ शकेल.



हेही वाचा

कनिका कपूरची दुसरी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

Coronavirus : कोरोना स्टॉप करोना, बॉलिवूडची मोहीम

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा