Advertisement

कनिका कपूरची दुसरी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये ही चाचणी करण्यात आली.

कनिका कपूरची दुसरी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
SHARES

बॉलिवूड गायिका कनिका कपूरची कोरोनाची दुसरी चाचणीही पॉझिटिव्ह आली आहे. सोमवारी ही चाचणी करण्यात आली होती. संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये ही चाचणी करण्यात आली.

कनिकाची तब्येत स्थिर असून ती नक्की कोणाकोणाला भेटलेली याची पोलीस चौकशी करत आहेत. रिपोर्टनुसार, कनिका लंडनहून परतल्यानंतर तीन पार्ट्यांना गेली होती. यावेळी ती जवळपास १६० लोकांच्या संपर्कात आली.

याआधी कनिकाविरुद्ध बेजबाबदार असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. कोरोना पॉझिटिव्ह असतानाही बेजबाबदारपणे वागत पार्ट्यांना गेल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. तिला घरातच आयसोलेट होण्याचा सल्ला देण्यात आला होता. पण तिनं नियमांना धाब्यावर बसवत पार्ट्या केल्या. यामुळेच तिच्यावर कलम १८८, २६९ आणि २७० लावण्यात आले आहेत.

कनिकाने गेल्या आठवड्यात लखनऊमध्ये गेल्यानंतर ताज हॉटेलमध्ये पार्टी दिली होती. याशिवाय ती अन्य दोन पार्ट्यांनाही गेली हाती. लखनऊमध्ये गेल्यानंतर गेल्या सात दिवसांमध्ये ती जिथे गेली त्या सर्व जागा जिल्हाधिकाऱ्यांनी बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

कनिका पॉझिटिव्ह आल्याचं कळताच तिच्या संपर्कात आसलेल्यांनी ट्विटरवर माहिती देण्यास सुरुवात केली. यामध्ये भाजपा नेत्या वसंधुरा राजे यांचं देखील नाव आहे. वसंधुरा राजे लखनऊच्या त्यापार्टीमध्ये गेल्या होत्या.

वसुंधरा राजे यांनी ट्विटरवर केलेल्या मेसेजमध्ये म्हटलं आहे की, खनऊमध्ये असताना मी आणि माझा मुलगा दुष्यंत आम्ही रात्रीच्या जेवणाला हजर होतो. दुर्दैवानं # कोविड १९ साठी सकारात्मक चाचणी घेणारी कनिका देखील पाहुणी म्हणून उपस्थित होती. मुबलक सावधगिरीची बाब म्हणजे माझा मुलगा आणि मी ताबडतोब आयसोलेशनमध्ये गेलो आहेत. सर्व आवश्यक खबरदारी घेत आहोत."

कणिकानं ज्या पार्टीत हजेरी लावली त्या पार्टीत भाजपाचे खासदार दुष्यंत सिंग उपस्थित होते. दुष्यंत सिंग यांनी दुसऱ्या दिवशी संसदेत देखील उपस्थिती लावली. त्यानंतर ते भारताच्या राष्ट्रपतींना भेटले. तथापि, याबद्दल कोणतीही अधिकृत पुष्टी प्राप्त झालेली नाही.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उच्चस्थरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत बॉलिवूड गायिका कनिका कपूर विरोधात एफआयर नोंदवण्याचे आदेश आदित्यनाथांनी दिले. वस्तुस्थिती लपवल्याबद्दल आणि जनमानसाचं आयुष्य धोक्यात घातल्याबद्दल कनिकाविरोधात एफआयआर नोंदविण्यात येणार आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले होते.हेही वाचा

Coronavirus : कोरोना स्टॉप करोना, बॉलिवूडची मोहीम

Coronavirus Lockdown : घर बसल्या फुल टू मनोरंजन, पाहा या ५ मराठी वेबसिरीज

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement