Advertisement

हृतिक रोशनकडून पालिकेला २० लाखांची आर्थिक मदत

देशातील मोठ्या व्यक्ती देखील शक्य ती मदत करताना दिसत आहेत. बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन यानं देखील मदतीचा हात पुढं केला आहे.

हृतिक रोशनकडून पालिकेला २० लाखांची आर्थिक मदत
SHARES

कोरोना व्हायरसच्या (coronavirus outbreak) विळख्यात संपूर्ण जग आलं आहे. जगभरात कोरोना व्हायरसचे लाखो रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनापासून जीव वाचवण्यासाठी ५० देशांमधील सरकारांनी सुमारे १ अब्जहून लोकांना घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे. आपल्या देशातही कोरोना व्हायरस लागण जलद गतीनं होत असून सर्व राज्यांपुढं कोरोनाचा संसर्ग रोखणयाचं आव्हान आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचे १२५ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकत्र येत कोरोनाशी लढा देत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३१ मार्चपर्यंत अंशत: लॉकडाऊन केलं होतं. त्यानंतर पंतप्रधान नेरंद्र मोदी यांनी भारतात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली.

यादरम्यान, देशातील मोठ्या व्यक्ती देखील शक्य ती मदत करताना दिसत आहेत. बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन यानं देखील मदतीचा हात पुढं केला आहे. हृतिकनं महाराष्ट्र शासनाला २० लाखाची आर्थिक मदत केल्याची माहिती आहे. मुंबई पालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी ही मदत वापरण्यात येणार आहे. कठीण काळात मदत करण्याची संधी मिळाल्याबद्दल हृतिकनं मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

सध्या हृतिक रोशन आपल्या कुटुंबियांसोबत राहत आहे. त्याची पत्नी सुझेन खान देखील त्याच्या घरी राहण्यास आली आहे. त्यामुळे तो सध्या त्यांच्या मुलांसोबत चांगला वेळ घालवताना दिसत आहे. तसंच नुकतंच त्यानं त्याच्या चाहत्यांना घरातच राहण्याचा सल्ला देखील दिला होता.हेही वाचा

Coronavirus : कनिका कपूरची तिसरी टेस्टही पॉझिटिव्ह

संबंधित विषय
Advertisement