'गर्ल्स हॉस्टेल'च्या सेटवर दिवाळीची धम्माल!

दिवाळी जवळ आली की घराची साफसफाई केली जाते. रंगरंगोटी, सजावट केली जाते. नवीन कपडे घेतले जातात. फराळाचे पदार्थ केले जातात. घरासमोर सुंदर रांगोळ्या काढल्या जातात. कलाकारांचे सण मात्र मालिकेच्या सेटवरच साजरे होतात. झी युवावरील ‘गर्ल्स हॉस्टेल’वर सुद्धा दिवाळीची अशीच धम्माल अनुभवयाला मिळाली! या मालिकेतील भयावह चित्रीकरणाच्या वातावरणातून थोडासा वेळ काढून गर्ल्स हॉस्टेलमधील ‘गर्ल्स'नी, त्याचप्रमाणे मालिकेतील इतर पात्रांनी दिवाळीची एक रंगतदार संध्याकाळ अनुभवली.

प्रियांका, तन्वी, मालती, वल्लरी, ध्यानलक्ष्मी, सागरिका, वनिता, बीना, सारा, दुर्गा आणि त्याचप्रमाणे विभव सेतू, महाजन काका, इन्स्पेक्टर जाधव या सर्वांनी या वेळी कामाच्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या. कोणी कंदील बनवला, तर कोणी पणत्या लावल्या, कोणी रांगोळी सजवली तर कोणी गोडाचे पदार्थ बनवले आणि शेवटी सगळ्यांनी एकत्र होऊन दिवाळी साजरी केली. त्यांनी साजऱ्या केलेल्या दिवाळी सणाचे हे काही खास फोटो...


हेही वाचा

प्रत्येक दिवाळीत 'ते' दिवस आठवतात - मोनालिसा बागल

पुढील बातमी
इतर बातम्या