पोरस, महाकाली, शनिदेव मालिकांच्या सेटला भीषण आग

  • मुंबई लाइव्ह टीम & मंगल हनवते
  • मनोरंजन

महाराष्ट्र-गुजरात सीमेजवळच्या उंबरगावमधल्या देहरी येथील वृदांवन स्टुडिओला भीषण आग लागली आहे. या आगीत 500 कोटी खर्चून तयार करण्यात आलेली सोनी टीव्हीवरील मालिका पोरस, कलर्स टीव्हीवरील महाकाली आणि शनिदेव या मालिकांचे सेट जळून खाक झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तर स्टुडिओचं खूप मोठं नुकसान झालं आहे.

आग कशामुळे?

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेलं नाही. पण शाॅर्ट सर्किटमुळं आग लागल्याची प्राथमिक माहिती असून स्टुडिओमध्ये पीओपी आणि प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणावर असल्यानं आग आणखी वाढत गेल्याचं म्हटलं जात आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या