Advertisement

अबब...या मालिकेचं बजेट ५०० कोटी!


अबब...या मालिकेचं बजेट ५०० कोटी!
SHARES

अमुक अमुक चित्रपटाचं बजेट हे कोटींच्या घरात गेलं अशा चर्चा अनेक वेळा आपण ऐकल्या आहेत. पण तुम्ही कधी ऐकलं आहे का? एका मालिकेचं बजेट कोटींच्या घरात गेलं आहे? क्वचितच ऐकलं असावं. या मालिकेनं तर दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी '२.०' चित्रपटाला देखील मागे टाकलं आहे. '२.०' या चित्रपटाचं बजेट ४൦൦ कोटींच्या घरात आहे. पण या मालिकेचं बजेट ५൦൦ कोटींच्या घरात आहे. नक्की ही मालिका आहे तरी कुठली? याची उत्सुकता तुम्हालाही असेल.




'२.൦' या चित्रपटापेक्षा वजनदार बजेट असलेली 'पोरस' ही मालिका सोनी टीव्हीवर लवकरच सुरू होणार आहे. या मालिकेवर तब्बल ५൦൦ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. गुजरातमधल्या उबर गावात या मालिकेचं शूटिंग सुरू आहे. ९ एकर भागावर ११ विविध सेट्स उभे करण्यात आले आहेत. हे भव्य सेट्स अमित सिंह आणि वैभव यादव यांनी डिझाईन केले आहेत. या मालिकेचं काही शूटिंग थायलंड, बँकॉकमध्येही होणार आहे. चित्रपटातील फाईट सिक्वेंससाठी थाय बेस्ड अॅक्शन डिरेक्टरदेखील नेमला आहे. स्वस्तिक प्रोडक्शन सोबत सिद्धार्थ कुमार तिवारी ही मालिका बनवत आहेत.



@adittyaredij ???? . . . . #Porus #tellywood #adittyaredij #sonytv #турецкийсериал

A post shared by Русский Фанклуб Сериала Порус (@porus_russian) on



कोण होता पोरस?

'पोरस' या मालिकेची कथा ऐतिहासिक आहे. पोरस हा पुरु राजा होता. वेदकालीन पुरू वंशातील एक पराक्रमी आणि स्वाभिमानी राजा अशी त्याची ओळख. पोरस राजाचं राज्य मध्य पंजाबात चिनाब आणि झेलम नद्यांच्या जवळ होतं. तक्षशिला या त्याच्या शेजारील राज्यातील अंभी राजा पोरसचा शत्रू होता. पोरसच्या पराक्रमाची अंभी राजाला दहशत होती. पोरस राजाच्या आयुष्यावर आधारीत पोरसची कथा आहे. शिवाय यात पोरस आणि अलेक्झांडर यांच्यात रंगलेलं युद्धही दाखवलं जाणार आहे.



#Porus #tellywood #adittyaredij #sonytv #shootig #comingsoon #индийскийсериал #турецкийсериал

A post shared by Русский Фанклуб Сериала Порус (@porus_russian) on



मालिकेत कोणत्या कलाकारांची वर्णी?

'पोरस' मालिकेत लक्ष लालवानी, रति पांडे, रोहित पुरोहित, मोहित अबरोल आणि सुहानी धनकी मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. रति पांडे ही राणीची भूमिका साकारणार आहे. रति हिटलर दीदी या मालिकेत शेवटची झळकली होती. त्यानंतर मोहित अबरोल एका योद्ध्याची भूमिका साकारत आहे. कवच या मालिकेत मोहित शेवटचा झळकला होता. याशिवाय प्रणित भट देखील या मालिकेत असून त्यानं महाभारत या मालिकेत खलनायकी भूमिका साकारली होती.



सोनी टीव्हीवर सध्या एकाहून एक सरस मालिका पाहायला मिळत आहेत. 'संकट मोचन महाबली हनुमान', 'सीआयडी', 'क्राइम पेट्रोल' आणि 'कुछ रंग प्यार के एेसे भी' या मालिका सध्या टीआरपीत आहेत. आता या मालिकांमध्ये आणखी एका मालिकेची भर पडणार आहे.



हेही वाचा

सारेगमप विजेतेपदाबद्दल काय म्हणतेय मराठमोळी अंजली गायकवाड!

पुन्हा एकदा शिजणार 'खिचडी'


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा