Advertisement

सारेगमप विजेतेपदाबद्दल काय म्हणतेय मराठमोळी अंजली गायकवाड!


सारेगमप विजेतेपदाबद्दल काय म्हणतेय मराठमोळी अंजली गायकवाड!
SHARES

'सारेगमप' लिटील चॅम्प्स २൦१७ या रिअॅलिटी शोच्या अंतिम फेरीत अंजली गायकवाड आणि श्रेयान भट्टाचार्य यांनी बाजी मारली. पहिल्यांदाच या शोमध्ये दोन विजेत्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. भूकंप आणि तुफान या दोन टीममध्ये गाण्यांची चांगलीच जुगलबंदी रंगली होती. गेल्या १൦ महिन्यांपासून भूकंप आणि तुफान या टीममधल्या लिटील चॅम्प्सनी प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं आहे.

'सारेगमप' विजेती अंजली गायकवाड ही मूळची अहमदनगरची राहणारी आहे. 11 वर्षांच्या अंजलीनं आत्मविश्वास आणि उत्तम गायकीच्या जोरावर हा विजय मिळवला आहे. ऑडिशनपासून ते लिटील चॅम्प ट्रॉफी जिंकण्याचा प्रवास कसा होता? यासंदर्भात 'मुंबई लाइव्ह'नं अंजलीशी खास बातचित केली आहे.


'सारेगमप' लिटील चॅम्प २൦१७ ची ट्रॉफी जिंकणं हे माझं स्वप्न होतं. नशीब चागलं असल्यानं लिटील चॅम्पच्या ऑडिशनमध्ये माझी निवड झाली. त्यानंतर माझा प्रवास सुरू झाला. ज्युरी आणि इतर स्पर्धकांकडून मला खूप शिकायला मिळालं. नेहा मॅम, जावेद सर आणि हिमेश सर यांनी वेळेवळी आम्हाला मार्गदर्शन केलं. माझ्या यशामध्ये सर्वांचाच हात आहे. मी झी टीव्हीची खूप आभारी आहे की त्यांनी मला एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. 

अंजली गायकवाड, विजेती, लिटील चॅप्म 


मराठमोळ्या अंजलीनं अंतिम सामन्यात 'दीवानी मस्तानी', 'झल्ला वल्ला' आणि 'मैं कोल्हापूर से आयी हूं' ही गाणी सादर करत प्रेक्षकांची मनं जिंकली. अंजली आणि श्रेयन यांच्यासोबत ध्रुन टिचकू, षण्मुखप्रिया, सोनाक्षी कर आणि वैष्णव गिरीश या स्पर्धकांनी देखील अंतिम फेरी गाठली आहे. मात्र, अंतिम फेरीत अंजली आणि श्रेयाननं बाजी मारली.



हेही वाचा

अंजली गायकवाड आणि श्रेयन भट्टाचार्य झी टीव्हीवरील 'सारेगमप' लिटील चॅम्पचे विजेते

'सारेगमप' विजेता श्रेयन भट्टाचार्यशी खास बातचित


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा