Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
56,153
3,882
Maharashtra
6,41,596
57,640

अंजली गायकवाड आणि श्रेयन भट्टाचार्य झी टीव्हीवरील 'सारेगमप' लिटील चॅम्पचे विजेते


अंजली गायकवाड आणि श्रेयन भट्टाचार्य झी टीव्हीवरील 'सारेगमप' लिटील चॅम्पचे विजेते
SHARES

'सारेगमप' हा रिअॅलिटी शो झी टीव्हीवरील लोकप्रिय शोपैकी एक आहे. या शोमधील अनेक स्पर्धकांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सुपर टॅलेन्टेड तुफान्स एकमेकांना टक्कर देत आपल्या अफलातून परफॉर्मन्सेसह प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. आता या शोनं शेवटचा टप्पा गाठला आहे. या शोची ट्रॉफी कोण जिंकणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होतेे. कोणता लिटिल चॅम्प यावेळेचा किताब पटकावेल याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. पण आता ही उत्सुकता संपली आहे. आम्ही सुद्धा तुमची उत्सुकता आणखीन न ताणता नक्की कुणी पटकावला 'सारेगमप' लिटील चॅम्पचा किताब हे सांगणार आहोत.


कोण आहे विजेता?

अंजली गायकवाड आणि श्रेयन भट्टाचार्य हे 'सारेगमप' लिटील चॅम्पचे विजेते आहेत. पहिल्यांदाच या शोमध्ये दोन विजेत्यांनी 'सारेगमप'चा किताब पटकावला आहे. फायनलमध्ये सहा स्पर्धक होते. यापैकी या दोघांनी बाजी मारली आहे. 'सारेगमप' लिटील चॅम्प्सचे जजेस नेहा कक्कड, जावेद अली आणि हिमेश रेशमिया यांनी विजेत्यांची नावं घोषित केली.


शेवटच्या भागात काय झालं?

अमृतसरचा धुन टिकू, विशाखापट्टनमचा शनमुखपरिया, केरलचा वैष्णव गिरीश आणि कोलकाताची सोनाक्षी कार 'सारेगमप' लिटील चॅम्पचे फायनलिस्ट होते. दुसरे स्पर्धक रिया बिस्वास आणि यमन्ना या दोघांना शेवटच्या भागात एलिमिनेट करण्यात आले होते.

'सारेगमप' आणि लिटील चॅम्प या रिअॅलिटी शोनं देशाला शेखर रावजनी, श्रेया घोषाल, कुनाल गांजावाला यांसारखे अनेक संगीतकार दिले आहेत. या शोनं गायकांना त्यांची कला जगासमोर आणण्यासाठी एक प्लॅटफॉर्म दिला आहे. त्यामुळे उभरत्या संगीतकारांसाठी हा शो आशेचा किरण आहे.


लिटील चॅम्पची जागा 'हा' शो घेणार

लिटील चॅम्प हा शो निरोप घेत असला तरी या जागी 'डांस इंडिया डांस' हा शो झी टी व्ही घेऊन येणार आहे. या शोमध्ये सुपर जज म्हणून मिथून दा दिसतील. तर अमृता खानविलकर आणि साहिल खट्टर या शोचे सुत्रसंचालन करताना दिसतील.Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा