Advertisement

'सारेगमप' विजेता श्रेयन भट्टाचार्यशी खास बातचित


'सारेगमप' विजेता श्रेयन भट्टाचार्यशी खास बातचित
SHARES

झी टीव्हीवरील 'सारेगमप' लिटील चॅम्प या रिअॅलिटी शोचा किताब अंजली गायकवाड आणि श्रेयन भट्टाचार्य  या दोघांनी पटकावला आहे. 'सारेगमप' लिटील चॅम्प शोच्या शेवटच्या भागात दोन टीममध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली. 'भूकंप' विरुद्ध 'तुफान' या दोन टीममधल्या लिटील चॅम्प्सनी एकापेक्षा एक गाणी सादर करत प्रेक्षकांची मनं जिंकली.



'सारेगमप' लिटील चॅम्प या रिअॅलिटी शोच्या विजेत्यांची नावं 'मुंबई लाइव्ह'नं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. दोघा विजेत्यांपैकी श्रेयन भट्टाचार्य याच्याशी 'मुंबई लाइव्ह'नं खास बातचित केली आहे. लिटील चॅम्पसमधला त्याचा प्रवास ते किताब जिकंण्यासाठिची मेहनत या सर्वावरच श्रेयनसनं 'मुंबई लाइव्ह'शी दिलखुलास बातचित केली.


सारेगमपची ट्रॉफी जिंकल्यानं मी खूप आनंदी आहे. माझ्यापेक्षा आई-बाबांना जास्त आनंद झाला आहे. त्यांचं स्वप्न मी आज पूर्ण केलं. यामागे माझी खूप मेहनत आहे. मी रोज रियाज करायचो. त्यामुळे मी आज ही ट्रॉफी जिंकली आहे. 

श्रेयन भट्टाचार्य, विजेता, सारेगमप लिटील चॅम्प


विजेत्याचं नाव घोषित होतानाचा क्षण कसा होता?

"विजेत्यांची घोषणा कधी होतेय याची मी आतुरतेनं वाट पाहत होतो. अखेर तो क्षण जवळ आला. विजेत्यांच्या नावाची घोषणा झाली. 'सारेगमप' लिटील चॅम्पची ट्रॉफी मी जिंकल्याचं कळताच मला खूप आनंद झाला. माझे आई-बाबा आणि चाहत्यांच्या डोळ्यात अक्षरश: आनंद अश्रू आले. मी हा क्षण कधीच विसरू शकणार नाही."


तुझे पुढचे प्लॅन्स काय आहेत?

"मला अजून खूप शिकायचे आहे. गाण्याचा रियाज रोज करायचा आहे. बाकी माझे आई-बाबा माझ्यासाठी जे ठरवतील ते मी करणार. पण सध्या तरी माझे पप्पा स्पेशल स्क्रिनिंग ठेवणार आहेत. मुंबई आणि कोलकात्यातल्या मित्र-परिवार आणि नातेवाईकांसोबत आम्ही सेलिब्रेशन करणार आहोत. सारेगमपचा शेवटचा एपिसोड मित्र-परिवार आणि नातेवाईकांसोबत मोठ्या स्क्रिनवर पाहणार आहोत. मी सुद्धा हा एपिसोड मोठ्या स्क्रिनवर पाहण्यासाठी उत्सुक आहे."


अंजली गायकवाडसोबत ट्रॉफी शेअर करताना कसं वाटलं?

अंजलीनं सुद्धा सर्वांना चांगली टक्कर दिली. तिच्यासोबत ट्रॉफी शेअर करताना मला खूप आनंद होत आहे. आम्ही दोघांनी खूप मेहनत घेतली आहे.


श्रेयन 'भूकंप' टिममधला स्पर्धक असून तो मुळचा कोलकातात राहणारा आहे. श्रेयन अजून लहान आहे. पण भविष्यात कसं आणि काय करायचं आहे याचा विचार त्यानं आधीच केला आहे. पुढच्या वाटचालीसाठी श्रेयनला 'मुंबई लाइव्ह'कडून शुभेच्छा.

 

हेही वाचा

अंजली गायकवाड आणि श्रेयन भट्टाचार्य झी टीव्हीवरील 'सारेगमप' लिटील चॅम्पचे विजेते


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा