पहिला मराठी अॅनिमेशनपट..प्रभो शिवाजी राजा!

  • मुंबई लाइव्ह टीम & संचिता ठोसर
  • मनोरंजन

लहान मुलांना एखादी गोष्ट अॅनिमेशनद्वारे सांगितली की ती त्यांना पटकन समजते. त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांचा इतिहास देखील लहान मुलांपर्यंत सहज सोप्या भाषेत पोहोचण्यासाठी इन्फिनिटी व्हिज्युअल आणि मेफाक यांनी शिवाजी महाराजांवर सचेतनपट म्हणजेच अॅनिमेटेड मूव्ही तयार केला आहे. सर्वसामान्य मुलांसोबतच शिवरायांचा इतिहास दिव्यांग मुलांनाही कळावा यासाठी 'प्रभो शिवाजी राजा' या चित्रपटाच्या ध्वनीफितीचंही अनावरण करण्यात आलं आहे. येत्या १६ फेब्रुवारीला 'प्रभो शिवाजी राजा' हा मराठी अॅनिमेशन चित्रपट प्रदर्शित होणार आहे.  

सर्वसामान्य मुलांसोबतच शिवरायांची गाथा दृष्टिबाधितांपर्यंतही पोहोचावी, या उद्देशाने 'प्रभो शिवाजी राजा' चित्रपटाची ध्वनीफित तयार करण्यात आली. यामुळे दृष्टिबाधित मुलांनाही शिवचरित्राची अनुभूती घेता येऊन त्यांना नवी प्रेरणा मिळेल.

निलेश मुळे, दिग्दर्शक

'प्रभो शिवाजी राजा' हा पहिला मराठी अॅनिमेशन मूव्ही आहे. समीर मुळे यांची ही कथा आहे. तर इतिहासकार निनाद बेडेकर यांनी या चित्रपाटचे संवाद लिहिले आहेत. डॉ. भरत बलवल्ली यांनी यातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. शंकर महादेवन, स्वप्नील बांदोडकर, नंदेश उमप, उदेश उमप, श्रीरंग भावे यांचा आवाज या अॅनिमेशन मूव्हीला लाभला आहे.


हेही वाचा

माधुरीची पहिली मराठी चित्रपट निर्मिती!

पुढील बातमी
इतर बातम्या