Advertisement

माधुरीची पहिली मराठी चित्रपट निर्मिती!


माधुरीची पहिली मराठी चित्रपट निर्मिती!
SHARES

जिच्या नजरेने आजही तिचे चाहते घायाळ होतात, जिच्या नृत्याची मोहीनी आजही चाहत्यांवर आहे, अशी सगळ्यांची आवडती धकधक गर्ल अर्थात माधुरी दीक्षित! लवकरच माधुरी 'बकेट लिस्ट' या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने माधुरीने केलेल्या फेसबुक लाइव्हवर आणखी एक खूषखबर चाहत्यांना दिली आहे. केवळ मराठी चित्रपटात अभिनयच नाही, तर लवकरच ही धकधक गर्ल मराठी चित्रपटाची निर्मितीही करणार आहे.


माधुरीचं स्पेशल फेसबुक लाइव्ह!

माधुरी सध्या बकेट लिस्ट या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. तिने बकेट लिस्टच्या सेटवरूनच आपल्या चाहत्यांशी फेसबुक लाइव्हद्वारे संवाद साधला. यावेळी माधुरीने चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली. एका चाहत्याने आता बकेट लिस्टनंतर काय असं विचारलं असता माधुरीने लवकरच ती एका मराठी चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची खूष खबर चाहत्यांबरोबर शेअर केली.




कसा असेल माधुरीचा चित्रपट?

नक्की तो चित्रपट कोणता आहे? त्यात कोणते कलाकार असतील? किंवा त्या चित्रपटाची कथा काय असेल? याबाबत माधुरीने खुलासा केलेला नाही. पण आजपर्यंत माधुरीने ज्या चित्रपटांमधून कामं केली आहेत, त्यातले बहुतांश चित्रपट हे प्रेमकथांवर आधारीत होते. त्यामुळे माधुरीची निर्मिती असलेला हा चित्रपटही प्रेमकथांवर आधारीत असल्याची शक्यता नाकारता येत नाही!



हेही वाचा

'धकधक गर्ल' माधुरी या चित्रपटातून करणार मराठीत पदार्पण!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा