'धकधक गर्ल' माधुरी या चित्रपटातून करणार मराठीत पदार्पण!


SHARE

तब्बल २३ वर्षांनंतर 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षित अाणि रेणुका शहाणे या जोडीची जादू पुन्हा एकदा अनुभवता येणार अाहे. माधुरी लवकरच मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्याची चर्चा होती. या दोघींचा एक मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार अाहे. या चित्रपटाच्या नावाबाबत फारच उत्सुकता होती. अाता माधुरीने स्वतःच या चित्रपटाचं नाव अाणि पोस्टर सोशल मीडियावर जाहीर करत या सर्व चर्चेला पूर्णविराम दिला अाहे. विजय देवसकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाची निर्मिती विवेक रंगाचारी यांनी केली अाहे. 'बकेट लिस्ट' असं या चित्रपटाचं नाव असून माधुरी त्यात प्रमुख भूमिकेत असेल. माधुरी दीक्षित अाणि रेणुका शहाणे ही दोन नावं समोर अाली की डोळ्यासमोर 'हम आपके है कौन' मधील यो दोन बहिणीच अाठवतात. मात्र या मराठी चित्रपटात दोघीही बहिणीच्या भूमिकेत नसतील.


तब्बल २३ वर्षांनंतर माधुरी दीक्षितसह काम करताना खूपच अानंद झाला. याअाधी भेटल्यानंतर अाम्ही कधी एकत्र काम करणार, यावरच चर्चा करायचो. अखेर अाम्हाला ही संधी 'बकेट लिस्ट' या मराठी चित्रपटाद्वारे मिळाली.

- रेणुका शहाणे, अभिनेत्री


माधुरी दीक्षितने हे पोस्टर ट्विटरवर पोस्ट करून प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.हेही वाचा - 

२३ वर्षांनंतर माधुरी-रेणुका एकत्र काम करणार!

माधुरीचा योद्ध्यांना अनोखा सलाम


संबंधित विषय
ताज्या बातम्या