Advertisement

माधुरीचा योद्ध्यांना अनोखा सलाम


माधुरीचा योद्ध्यांना अनोखा सलाम
SHARES

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने आता एक वेगळाच अवतार धारण केला आहे. सध्या तिने आपल्या या नव्या अवताराचा एक फोटोही ट्वीटरवर शेअर केला आहे. ज्यात तिने योद्धाचा ड्रेस परिधान केला आहे. तिने परिधान केलेला ड्रेस हा एका जपानी सामुराई योद्धाचा ड्रेस आहे. या फोटोत माधुरी अतिशय कणखर दिसत असून तिच्या चेहऱ्यावरील भाव एका योद्धासारखंच आहे.



जगभरातील योद्धांना दिली सलामी

माधुरीने हा ड्रेस परिधान करत जगभरातील योद्धांना सलामी दिली आहे. याबरोबरच तिने एक संदेशही लिहिला आहे. माधूरी म्हणते, ''आज मी सामुराय मुकूट आणि तलवार हातात घेऊन पाहिली. जगभरातील योद्ध्यांना अशाप्रकारे पेहराव करून लढाईला जावं लागतं. या योद्धांच्या शौर्याला आणि सामर्थ्याला माझा सलाम.’’


माधुरी रेणूका २३ वर्षानंतर एकत्र

लवकरच माधुरी एका मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात माधुरीबरोबर रेणूका शाहणेही आहे. तब्बल २३ वर्षानंतर पुन्हा एकदा या जोडीची जादू रसिक प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. विजय देवसकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं असून चित्रपटाचं नाव अद्याप गुलदस्त्यात आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा