Advertisement

माधुरी बनली सुपरबाईक रायडर!


माधुरी बनली सुपरबाईक रायडर!
SHARES

अंगात बाईकर जॅकेट...डोक्यावर हेल्मेट आणि एखाद्या सुपरबायकरप्रमाणे बाईक चालवणाऱ्या माधुरी दीक्षितचा हा फोटो बघून गोंधळात ना? खरंतर 'बकेट लिस्ट' या सिनेमाच्या निमित्ताने माधुरी पहिल्यांदाच सुपर बाईक चालवताना दिसली. या सिनेमात ती पुण्याच्या साने कुटुंबातील गृहिणीच्या भूमिकेत असून आपल्या आयुष्याच्या एका वळणावर ही गृहिणी थेट बाईकवर स्वार होते. यामागे नेमकी काय गोम आहे? हे चित्रपट पाहिल्यावरच आपल्याला कळणार आहे.



माधुरीने उडवली धमाल

यावेळी सिनेमाच्या निमित्ताने सुपरबाईक चालवण्याचा अनुभव तर घेतलाच, शिवाय पुण्यात भावंडांबरोबर धमालही केल्याचं माधुरी म्हणाली. याशिवाय पुण्यातल्या पर्वती, शिंदेछत्री अशा कितीतरी ऐतिहासिक ठिकाणांना तिने भेटीही दिल्या. 'आम्ही भावंडं इथं वेड्यासारखे भटकलो आणि चिंचा, बोरं, करवंदांवरही ताव मारला. या भूमिकेसाठी पुणेकरांचा हजरजबाबीपणा आणि टोमणेदार विनोदी बोलणंही मी आत्मसात केलं,' असं माधुरीने म्हटलं आहे.


माधुरीचा ग्लॅमरस लूक!

बकेट लिस्ट सिनेमाच्या निमित्ताने रसिकांना नेहमीपेक्षा वेगळी माधुरी पाहायला मिळणार असल्याचं दिग्दर्शक तेजस विजय प्रभा देऊस्कर यांनी म्हटलं आहे. 'माधुरीची हिरोईनची इमेज बाजूला ठेवून तिला या सिनेमातल्या भूमिकेसाठी डी-ग्लॅम लूक आम्ही दिला. या लूकमध्येही माधुरी खूप सुंदर दिसत असल्याचं म्हणत या भूमिकेसाठी आपलं सर्वस्व ओतून तिने काम केल्याचं देऊस्कर यांनी म्हटलं आहे. माधुरीची ही वेगळी छबी चाहत्यांना नक्कीच आवडेल, असा विश्वासही देऊस्कर यांनी दाखवला आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा