अभिनेता शेखर फडके नव्या भूमिकेत!

आपल्या दमदार अभिनयाने लोकप्रिय असलेला शेखर फडके आता प्रेक्षकांना वेगळ्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. शेखर प्रेक्षकांसाठी एक कोरं करकरीत नाटक घेऊन येत आहे. 'जो भी हो देखा जाएगा' हे नाटक लवकरच रंगभूमीवर येत आहे. या नाटकाच्या निमित्ताने तो अभिनेता बरोबरच एक निर्माता आणि दिग्दर्शक म्हणूनही प्रेक्षकांसमोर येणार आहे.

या आधी शेखर नाटक, सिनेमा आणि विविध मालिकांमधून आपल्यासमोर आला तो एक उत्तम अभिनेता म्हणून. 'तो मी नव्हेच’, 'घर श्रीमंताचं’, 'स्माईल प्लीज’, 'एका लग्नाची गोष्ट’, 'वन टू का फोर’, 'क्रॉस कनेक्शन’, 'बुढा होगा तेरा बाप’, 'गोष्ट तुझी माझी’, 'जादू तेरी नजर’, 'लेले विरूद्ध लेले’, 'जो भी होगा देखा जाएगा’, 'पहिलं वहिलं' यांसारख्या नाटकांमध्ये शेखरने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. तर सरस्वती, झोका, कान्हा, दिल्या घरी सुखी रहा, वादळवाट, साहेब बिबी आणि मी, ४०५ आनंदवन या मालिका, आणि थैमान, भागमभाग यांरख्या चित्रपटांमधून शेखरने आपली वेगळी ओळख निर्माण केली.

'जो भी हो देखा जाएगा' हे शेखरचं दिग्दर्शक म्हणून पहिलं नाटक आहे. या आधी शेखरने अनेक भूमिका एकाच वेळी निभावल्या आहेत. मात्र दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता अशा तिहेरी भूमिका असणारं हे शेखरचं पहिलंच नाटक आहे.


हेही वाचा

प्रियांका चोप्राचा तिसरा मराठी सिनेमा!

पुढील बातमी
इतर बातम्या