Advertisement

प्रियांका चोप्राचा तिसरा मराठी सिनेमा!

'व्हेंटिलेटर' आणि 'काय रे रास्कला' या दोन भन्नाट मराठी चित्रपटांनंतर आणखी एका मराठी चित्रपटाची तयारी प्रियांकाने सुरू केली आहे. प्रियांका चोप्रा निर्मित 'फायरब्रँड' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

प्रियांका चोप्राचा तिसरा मराठी सिनेमा!
SHARES

केवळ भारतीय लोकांवरच नाही, तर परदेशातील लोकांवरही जिने आपल्या अभिनयाची भुरळ घातली, ती म्हणजे प्रियांका चोप्रा! केवळ हिंदी चित्रपटसृष्टीतच नाही, तर मराठी चित्रपटसृष्टीत सुद्धा प्रियांकाने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. 'व्हेंटिलेटर' आणि 'काय रे रास्कला' या दोन भन्नाट मराठी चित्रपटांनंतर आणखी एका मराठी चित्रपटाची तयारी प्रियांकाने सुरू केली आहे. प्रियांका चोप्रा निर्मित 'फायरब्रँड' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.ॉ

'व्हेंटिलेटर' या चित्रपटाला सर्वच स्तरातून पसंती मिळाली. त्यामुळे मला असं वाटतं की 'व्हेंटिलेटर'सारखे इमोशनल, उत्तम स्क्रिप्ट आणि वेगवेगळे कॅरेक्टर असणारे चित्रपट प्रेक्षकांना आवडतात. त्यामुळे 'फायरब्रँड'सारख्या चित्रपटांची निर्मिती करायला मी उत्सुक आहे.

मधू चोप्रा, निर्माती

प्रियांका चोप्रा आणि डॉ. मधु चोप्रा यांचं प्रॉडक्शन हाऊस, पर्पल पेबल पिक्चर्स 'फायरब्रँड'ची निर्मिती करत आहे. 'फायरब्रँड'चं लेखन आणि दिग्दर्शन अरूणाराजे यांनी केलं आहे. अरूणा राजे यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

'फायरब्रँड' ही एक नातेसंबंध दाखवणारी कथा आहे. रिलेशनशिपमधले चढ-उतार या चित्रपटात दाखवण्यात येणार आहेत. मला खूप आनंद होतोय की प्रियांका चोप्रा आणि मधू चोप्रा 'व्हेंटिलेटर' आणि 'फायरब्रँड'सारख्या चित्रपटांना प्रोत्साहन देत आहेत. त्यांच्यामुळे प्रादेशिक सिनेमांना वाव मिळत आहे.

अरूणा राजे, लेखिका-दिग्दर्शिका

'फायरब्रँड'मध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. यात उषा जाधव, गिरीश कुलकर्णी, सचिन खेडेकर, राजेश्वरी सचदेव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यामध्ये उषा जाधव सुनंदा राऊत या वकिलाच्या भुमिकेत पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे. तर सुनंदाच्या आर्किटेक्ट पतीच्या भूमिकेत गिरीश कुलकर्णी असणार आहे.



हेही वाचा

'हॉस्टेल डेज'मध्ये बघा ६ नवीन चेहरे


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा