Advertisement

'हॉस्टेल डेज'मध्ये बघा ६ नवीन चेहरे


'हॉस्टेल डेज'मध्ये बघा ६ नवीन चेहरे
SHARES

हॉस्टेलच्या दिवसांची आठवण करून देणारा 'हॉस्टेल डेज' या सिनेमात प्रार्थना बेहेरे, आरोह वेलणकर, विराजस कुलकर्णी, अक्षय टंकसाळे आणि संजय जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पण या सिनेमात खरी धमाल असणार आहे, ती ६ नवीन मुलींच्या बेधडक अभिनयाची. आता त्या ६ जणी कोण? त्या काय करतात? आणि त्या सिनेमात कशा आल्या? याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे.


सहा नवीन चेहरे कोण?

अंकिता लांडे, सागरिका रुकारी, अंकिता बोरा, सोनिया पटवर्धन, पूर्वा देशपांडे आणि पूर्वा शिंदे या ६ जणांचा हा पहिलाच चित्रपट असून या मुली हॉस्टेलमध्ये धमाल करायला सज्ज झाल्या आहेत. चित्रपट १२ जानेवारी २०१८ रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. प्रख्यात लेखक, संगीत दिग्दर्शक आणि दिग्दर्शक अजय नाईक यांचा 'हॉस्टेल डेज' हा सिनेमा १२ जानेवारी २०१८ रोजी प्रदर्शित होत आहे.


'त्या' सहा जणी काय करतात?

अंकिता बोरा ही चार्टर्ड अकाऊंटंटचा अभ्यास करत आहे. अनेक स्टेज शोजमध्ये तिने अँकरिंग केलं आहे. अनेक वक्तृत्व स्पर्धांमध्ये तिने पारितोषिकं पटकावली आहेत. सोनिया पटवर्धन सध्या एस. पी. महाविद्यालयात बारावीचं शिक्षण घेत आहे. पूर्वा शिंदे हीसुद्धा एक व्यावसायिक मॉडेल आहे. आणि तिने अनेक ब्रॅन्ड्ससाठी मॉडेलिंग केलं आहे. ‘श्रावण क्वीन’ची अंतिम फेरी तिने गाठली होती. तिथेच नाईक यांनी तिची निवड केली. यातील अंकिता लांडे ही आयुर्वेद (बीएएमएल)चं शिक्षण घेत असून ती एक व्यावसायिक मॉडेलही आहे. अनेक फॅशन शोजमध्ये रॅम्पवर उतरली आहे. अनेक ब्रॅन्ड्ससाठी मॉडेलिंग केलं आहे. ‘श्रावण क्वीन’च्या अंतिम फेरीत तिला अजय नाईक यांनी हेरलं आणि 'हॉस्टेल'साठी तिची निवड झाली.

सागरिका रूकारी हिने साहित्यामधून बीए केलं आहे. तीसुद्धा एक व्यवसायिक मॉडेल असून अनेक फॅशन शोजमध्ये तिने रॅम्प वॉक केले आहे. ती ‘श्रावण क्वीन’ची उप-विजेती होती. तिथेच तिची या चित्रपटासाठी निवड झाली. पूर्वा देशपांडे सध्या ए. पी. महाविद्यालयातच एफवायबीएचं शिक्षण घेत आहे. महाविद्यालयाकडून पुरुषोत्तम, फिरोदिया, दाजीकाका करंडक अशा स्पर्धांमध्ये तिने कामं केली आहेत. दाजीकाका करंडकचे आयोजक असलेल्या अजय नाईक यांनी तिचं काम पाहिलं आणि तिला संधी दिली.

या चित्रपटाची प्रस्तुती 'श्री पार्श्व प्रॉडक्शन्स' आणि 'ट्वेन्टी फोर स्टुडिओ' यांनी केली आहे. चित्रपटाची निर्मिती श्री पार्श्व प्रॉडक्शनच्या सुभाष बोरा, चंदन गेहलोत आणि हरविंदर सिंग यांनी अजय नाईक प्रॉडक्शनच्या सहकार्यानं केली आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा