अज्या-शितलीचं अखेर लग्न होणार!

  • मुंबई लाइव्ह टीम & संचिता ठोसर
  • मनोरंजन

'लाखात एक माझा फौजी' असं म्हणत प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या झी मराठी वाहिनीवरील 'लागिरं झालं जी' या मालिकेने नुकताच ३०० भागांचा टप्पा गाठला. शितली आणि अज्याची प्रेमकथा प्रेक्षकांनाही भावात आहे, तशीच ती आपलीशी देखील वाटत आहे. शीतल आणि अजिंक्यच्या प्रेमाला अनेकांचा विरोध होता. पण तो विरोध न जुमानता त्यांच्या प्रेमावरील दृढ विश्वासामुळे ते दोघे लवकरच एकत्र येणार आहेत. लग्नाची बोलणी झाल्यानंतर अजिंक्य आणि शीतलच्या लग्नाचा मुहूर्त ३० मेचा निघाला आहे.

शितली-अज्या करणार सामुहिक विवाह

सध्या या दोघांच्याही घरी लग्नाची गडबड सुरु आहे. अशा परिस्थितीत जयश्री अचानकपणे लग्न करुन येते आणि घरच्यांना आश्चर्याच्या धक्का देते. तिच्या अशा अचानक घेतलेल्या निर्णयामुळे घरात वादविवाद होतात. पण अजिंक्य शीतलचं लग्न ठरल्यावेळी करायचं ठरतं.

आर्थिक संकटात घेतला निर्णय

अजिंक्य आणि शितलचं लग्न होऊ नये यासाठी हर्षवर्धन खूप अतोनात प्रयत्न करतोय. त्यांच्या लग्नात अडथळा आणण्यासाठी हर्षवर्धन शीतलच्या घरात आर्थिक संकटं आणतो. ज्यामुळे अजिंक्य आणि शीतल शेवटी सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करायचा निर्णय घेतात आणि घरच्यांची त्यासाठी परवानगी मिळवतात. अजिंक्य आणि शीतलचा हा विवाह सोहळा आणि लगीन घाईतील मजा मस्ती प्रेक्षक येत्या भागात पाहू शकणार आहेत.


हेही वाचा

शनाया होणार का सौमित्रची?

पुढील बातमी
इतर बातम्या