Advertisement

शनाया होणार का सौमित्रची?


शनाया होणार का सौमित्रची?
SHARES

सध्या टीआरपीमध्ये नंबर वनवर असणारी मालिका म्हणजे 'झी मराठी'वरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’. या मालिकेच्या पहिल्या भागापासूनच राधिका, गॅरी आणि शनाया महाराष्ट्राची लाडकी झाली आहेत. काही दिवसांपूर्वी या मालिकेत राधिका आणि गुरुनाथ यांचा जुना मित्र सौमित्रची एंट्री झाली. या व्यक्तिरेखेला देखील प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला.

IMG-20180522-WA0037.jpg

राधिका आणि गुरुनाथ एकत्र येतील?

सध्या मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं की गुरु शनायासाठी त्याच्या आई वडिलांचा अपमान करतो, शनाया त्याला यात दुजोरा देत असताना राधिका तिच्या श्रीमुखात भडकावते आणि गुरुनाथला देखील धमकावते. घडलेल्या प्रकारामुळे वातावरण खूपच तणावाचं झालं आहे. हा अपमान सहन न झाल्यामुळे आई बाबा नागपूरला जाण्याचा निर्णय घेतात. सौमित्र त्यांना आग्रह करून थांबवतो. घडलेल्या सर्व प्रकारामुळे सौमित्र आता शनाया आणि गुरूला कायमचं वेगळं करण्याचा ठाम निर्णय करतो त्यामुळे तो राधिका आणि गुरुनाथला एकत्र आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहे.


शनाया येणार का सौमित्रकडे?

आता त्यासाठी सौमित्र एक वेगळीच शक्कल लढवतो. शनायाचं गुरुवर नाही तर गुरूच्या पैशांवर खूप प्रेम आहे हे सौमित्राला कळून चुकलं आहे. त्यामुळे सौमित्र त्याच पैशाच्या जोरावर शनायाला इंप्रेस करण्याचा प्रयत्न करतो. सौमित्र शनायाला आपल्या श्रीमंत असण्याचा पुरावा दाखवतो. शनायाला इंप्रेस करण्यासाठी सौमित्र तिला आवडण्याऱ्या सर्व गोष्टी करताना दिसणार आहे. इतकंच नव्हे तर तो तिला डिनरसाठी देखील विचारतो. आता शनायावर त्याची भुरळ पडेल का? शनाया गुरूला सोडून सौमित्रकडे जाईल का? हे पाहणं प्रेक्षकांसाठी रंजक ठरणार आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा