... म्हणून ऋषी कपूर यांना रडू कोसळलं होतं

श्री 420 या चित्रपटातील 'प्यार किया इकरार किया...' हे गाणं हिंदी सिनेमाच्या अविस्मरणीय गाण्यांपैकी एक आहे. या चित्रपटात राज कपूर आणि नर्गिस यांच्यात सुंदर प्रेमकहाणी पाहायला मिळते. पण या गाण्यात एक सीन आहे जेव्हा तीन मुले राज कपूर आणि नर्गिस यांच्याबोवती रस्त्यावर फिरत असतात. रस्त्याच्या कडेला असलेल्या पावसात रेनकोट घातलेली तिन्ही मुलं कपूर कुटुंबातील आहेत हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. सर्वात धाकटा आणि सर्वांत सुंदर दिसणारा मुलगा इतर कोणी नाही तर ऋषी कपूर आहे. या सीनमध्ये दिसणारी अन्य मुले ऋषी कपूरची भावंडं आहेत.

पहिल्या चित्रपटात कोसळलं रडू

एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ऋषी कपूर एका इव्हेंटमध्ये आले होते. यादरम्यान, आपल्या फिल्मी करिअरशी संबंधित अनेक अनुभव त्यांनी सांगितले होते. ऋषी कपूर म्हणाले की, प्यार किया इकरार किया या गाण्याच्या चित्रिकरणा दरम्यान मी खूप लहान होतो. गाण्यात मला माझ्या भावा आणि बहिणीसोबत रस्त्यात चालत जायचं होतं. अर्थात, माझा हा सीन बघण्यासाठी खूप सोपा वाटत असेल. परंतु चित्रित करणं खूप कठीण होतं.

पावसात हा सीन चित्रित करण्यात आला होता. त्यामुळे जसा मी चालायला लागलो माझ्या चेहऱ्यावर पाणी यायचं. त्यामुळे मला तो सीन करणं कठिण जात होतं. अखेर मी रडायला लागलो आणि डोळे बंद केले. मग संपूर्ण शूटिंग थांबलं. नर्गिसजी माझ्याकडे आल्या. त्या म्हणाल्या की, जर तू रडणं थांबवलंस तर मी तुला चॉकलेट देईन. त्यावेळी, मी एका चॉकलेटसाठी पाण्यात चालतानाचा पहिला शॉट दिला. हा सीन खूप खास होता कारण पापाच्या चित्रपटात माझा पहिला सीन होता.

अशी मिळाली जोकरची भूमिका

१९७० साली मेरा नाम जोकर चित्रपटासाठी माझी निवड जेवणाच्या टेबलावर झाली, असं त्यावेळी ऋषी कपूर यांनी सांगितलं. ते म्हणाले की, पापा राज कपूर मुख्य भूमिकेत होते. चित्रपटात मला त्यांच्या शाळेतील मुलाची भूमिका साकारायची होती. आम्ही सर्व पापा आणि आईसोबत जेवणाच्या टेबलावर जेवायला बसलो. तेव्हा वडिलांनी आईला सांगितलं की, चिंटूनं या चित्रपटात माझी बालपणीची भूमिका साकारली पाहिजे. हे ऐकून आईनं सहजपणे म्हटलं की, यामुळे त्याच्या अभ्यासामध्ये कोणताही अडथळा येऊ नये. मी तिथे उपस्थित दोघांनाही शांतपणे ऐकत राहिलो. त्यानंतर मी डायनिंग टेबलवरून थेट माझ्या खोलीकडे आलो. तिथं पोहोचल्यावर मी पेन-पेपर बाहेर काढला आणि ऑटोग्राफचा सराव करण्यास सुरवात केली.

रडताना आरशात पाहायचे

मुलाखतीदरम्यान ऋषी कपूर म्हणाले होते की, आईचा मृत्यू झाल्यानंतर मी खूप रडलो. पण रडता रडता मी माझा चेहरा वारंवार आरशात पाहायचो. मला याबद्दल धुसर आठवतंय. पण माझे काका शशी कपूर मला नेहमी या गोष्टीची आठवण करून देत असत. याचा अर्थ असा नाही की मी त्या कठिण परिस्थितीत रडताना पण माझा अभिनय पाहत होतो.


हेही वाचा

ऋषी कपूर यांच्या निधनावर बॉलिवूडनं व्यक्त केली हळहळ

पुढील बातमी
इतर बातम्या