'अशी' आहे मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर!

भारताची २१ वर्षीय मानुषी छिल्लरनं २०१७ चा मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावावर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी देखील मानुषीचं अभिनंदन केलं आहे.

 

मानुषी ही भारतातील सहावी सौंदर्यवती आहे जिनं मिस वर्ल्डचा किताब पटकावला आहे. यापूर्वी ऐश्वर्या राय, डायना हेडन, युक्ता मुखी, प्रियंका चोप्रा, रिता फारिया यांनी मिस वर्ल्डचा किताब पटकावला आहे. पण जवळपास १७ वर्षांनंतर भारतीय सौंदर्यवतीच्या नावावर हा किताब झाला. त्यामुळे भारतीयांसाठी ही नक्कीच अभिमानास्पद आहे.  

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचा परिचय

मानुषीचा जन्म १४ मे १९९७ रोजी झाला. सध्या मानुषी सोनीपत इथल्या भगतपूल सिंह सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. तिनं तिचं प्राथमिक शिक्षण नवी दिल्लीतील सेंट. थॉमस स्कूलमधून पूर्ण केलं आहे.

मानुषीचे वडील मित्रबसू व्यवसायानं डॉक्टर आहेत. सध्या तिचे वडील दिल्लीतील इनमास इन्स्टिट्यूटमध्ये सहाय्यक संचालक पदावर कार्यरत आहेत. तर तिची आई नीलम इब्मास कॉलेजमध्ये बायोमॅट्रिक्सची प्राध्यापिका आहे.

२५ जून २०१७ मध्ये मानुषीला फेमिना मिस इंडिया वर्ल्ड २०१७ नं गौरवण्यात आलं होतं. ती आशियातील पहिली विश्वसुंदरी रिता फारियाला आदर्श मानते.

मेडिकल शिक्षणासोबतच ती अनेक गोष्टींमध्ये तरबेज आहे. मानुषी कुचिपुडी नृत्यांगना देखील आहे. तिनं प्रसिद्ध कुचिपिडी नर्तक राजा आणि राधा रेड्डी तसंच कौशल्या रेड्डी यांच्याकडून कुचिपुडीचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलं आहे.

'मुंबई लाइव्ह'तर्फे मानुषी छिल्लरला मिस वर्ल्डचा किताब जिंकल्याबद्दल अभिनंदन. 

कव्हर फोटो सौजन्य - Rita Gangwani


हेही वाचा 

भारताच्या मानुषी छिल्लरनं पटकावला 'मिस वर्ल्ड'चा किताब

पुढील बातमी
इतर बातम्या