सिद्धार्थ 'हिच्या'सोबत गोव्यात; चर्चा पुन्हा सुरू

  • मुंबई लाइव्ह टीम & संचिता ठोसर
  • मनोरंजन

चंदेरी दुनियेमध्ये आज नात्यात असणारं कपल उद्या एकत्र असेलच याची कुणीच गॅरंटी देऊ शकत नाही! बॉलिवूडमध्ये अशा सेलेब्रिटी कपलवर जोरदार गॉसिप रंगतात. पण आता हा ट्रेंड मराठी सेलेब्रिटींसाठीही रुजू होतोय. असंच काहीसं घडतंय अभिनेता सिद्धार्थ चांदेकरबरोबर. 'गुलाबजाम' या चित्रपटाच्या यशामुळे सध्या सिद्धार्थ 'साँतवे आसमानपर' आहे! आणि आपलं हेच यश सिद्धार्थ त्याच्या 'चर्चित' गर्लफ्रेंडसोबत गोव्यात एन्जॉय करताना दिसतोय.

सिद्धार्थची ही 'चर्चित' गर्लफ्रेंड म्हणजे मिताली मयेकर! हे दोघही सध्या गोव्यात एकत्र वेळ घालवतायत. त्यांनी त्यांचे गोव्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 'सध्या सारं काही जादू व्हावी असं भासत असून मी प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहे', अशा कॅप्शन खाली मितालीने आपला एक सेक्सी फोटो शेअर केला आहे.

 

तिच्या इन्स्टाग्रामवरच्या पोस्ट्सवरून तरी ती सिद्धार्थसोबत घालवत असलेला प्रत्येक क्षण सेलिब्रेट करतेय असंच दिसतंय!

 सिद्धार्थ आणि मिताली हे रिलेशनशिपमध्ये असल्याचं आता जगजाहीर आहे. या दोघांनीही व्हॅलेन्टाईन डे ला फोटो शेअर करून आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. सिद्धार्थ आणि मितालीचं नातं दिवसेंदिवस बहरत असल्याचं त्यांनी शेअर केलेल्या फोटोंवरून सहज लक्षात येतंय.
 

या आधी सिद्धार्थ आणि रसिका सुनील म्हणजेच माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील शनाया हिच्याबरोबर प्रेमाच्या चर्चा रंगल्या होत्या. सिद्धार्थ आणि रसिका कायम एकत्र दिसायचे. मात्र, नंतर त्यांच ब्रेक अप झालं आणि सिद्धार्थ मिताली मयेकरसोबत दिसू लागला.


हेही वाचा

सिद्धार्थ चांदेकर पुन्हा पडला प्रेमात! शनायाशी झालं ब्रेकअप?

पुढील बातमी
इतर बातम्या